काही घटकांकडून जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न : पंतप्रधान मोदी | पुढारी

काही घटकांकडून जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काही घटकांनी केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव ते सुवर्णमयी भारताकडे’ कार्यक्रमाच्या उद्‍घाटन‍प्रसंगी केला. ब्रम्हकुमारी संस्थेकडून स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त देशाच्या विविध भागात नानाविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याची सुरुवात मोदी यांच्या हस्ते झाली.

देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. केवळ राजकारण म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. कारण यामुळे देशाची प्रतिमा मलिन झालेली आहे, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, देशविरोधी प्रचाराला उत्तर देण्याचे काम ब्रम्हकुमारीज सारख्या संस्था करू शकतात. विविध देशांमध्ये भारताबद्दल योग्य माहिती जावी, यासाठी लोकांनी पुढे आले पाहिजे. पंतप्रधान मोदी यांनी याआधीही गतवर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात एका कार्यक्रमात सिलेक्टीव्ह मानवी हक्काचा मुद्दा उपस्थित केला होता.

पंतप्रधान मोदी यांनी ब्रम्हकुमारी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. ‘माझा देश – आरोग्यमयी देश’, ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण शेतकरी, महिलांची उन्नती, अनदेखा भारत सायकल रॅली, युनायटेड इंडिया मोटार बाईक मोहीम, हरित भारत आदी कार्यक्रमांचे आयोजन ब्रम्हकुमारी संस्थेकडून आगामी काळात करण्यात आलेले आहे.

हेही वाचलं का? 

 

Back to top button