रणजितसिंह डिसले इनोव्हेशन इन एजुकेशन योजनेचे ब्रँड अँम्बेसीटर  | पुढारी

रणजितसिंह डिसले इनोव्हेशन इन एजुकेशन योजनेचे ब्रँड अँम्बेसीटर 

सोलापूर पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य शासनाच्या कौशल्य विकास व रोजगार विभागाच्या महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी च्या वतीने राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रसार व प्रचाराकरीता सदिच्छा दूत म्हणून ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची निवड करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात डिसले गुरुजींनी हाती घेतलेले नाविन्यपूर्ण उपक्रमांमूळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण अधिक सुलभ होत आहे. नाविन्यपूर्ण शिक्षणासाठी हाती घेतलेले उपक्रम नव उद्योजकांना प्रेरणादायी करणारे ठरतील, म्हणूनच हे उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावेत या हेतूने शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यताचे सदिच्छा दूत म्हणून निवड केली आहे.

सदिच्छादूत म्हणून आता डिसले गुरुजी इनोव्हेशन सोसायटीचा विकास होण्यासाठी तळागाळातील विद्यार्थी, नव उद्योजक, प्राध्यापक, स्टार्टअप यांच्यापर्यंत योजनांचा प्रसार आणि प्रचार करतील.

राज्य शासनाच्या स्टार्टअप धोरण २०१८ च्या प्रभावी अंमलबजावणी करता महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. यामार्फत राज्यातील सर्व घटकांकरीता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबंधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबवले जातात.

वाचा : होटगीत विवाहितेची मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

वाचा : श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग

Back to top button