संकर्षण कऱ्हाडे झाला जुळ्या मुलांचा बाबा, पहिला फोटो व्हायरल

संकर्षण कऱ्हाडे झाला जुळ्या मुलांचा बाबा, पहिला फोटो व्हायरल

मुंबई; पुढारी ऑनलाईन: मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे बाबा झाला आहे. संकर्षण कऱ्हाडे याची पत्नी शलाका पांडेने २७ जून रोजी जूळ्या बाळांना जन्म दिला आहे. ही गुडन्यूज संकर्षणने स्वत: सोशल मीडियावर देत आपल्या बाळाची नावेदेखील ठेवली आहेत.

संकर्षण कऱ्हाडे दोन बाळासोबतचा एक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर केला आहे. या फोटोत संकर्षणच्या चेहरावर आनंद दिसत आहे.

अधिक वाचा 

संकर्षणने मुलाचे नाव 'सर्वज्ञ' आणि मुलीचे 'स्रग्वी' असे ठेवले आहे. यासोबत या नावाचा अर्थही सांगितला आहे. सर्वज्ञ म्हणजे ज्ञानी आणि स्रग्वी म्हणजे पवित्रं तुळस… अशी कॅप्शन संकर्षणने लिहिली आहे.

अधिक वाचा 

संकर्षणने आपल्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर पहिल्यांदा शेअर केला आहे. यामुळे या दोन्ही नावाच्या चर्चांना उधान आले आहे.
या फोटोवर कलाकार आणि चाहत्यांनी कॉमेन्टस करत शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अधिक वाचा 

संकर्षणने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. त्‍याने 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

'माझीया प्रियाला' आणि 'आभास हा' या मालिकांमध्ये संकर्षणने काम केले. नंतर त्याने 'रामराम महाराष्ट्र' या शोचे सूत्रसंचालनही केले आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news