पुष्कर-कृतिका : ‘याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं, आली वाघाची डरकाळी’

पुष्कर-कृतिका : ‘याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं, आली वाघाची डरकाळी’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा दमदार ठसा उमटवणारे नाव म्हणजे पुष्कर जोग. हटके भूमिकांमुळे पुष्कर अल्पावधीतच रसिकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. 'जबरदस्त', 'धूम २ धमाल', सत्य, सासूचं स्वयंवर अशा मराठी सिनेमांसह 'जाना पहेचाना', 'इएमआय' अशा हिंदी सिनेमांमधून पुष्करने अमराठी प्रेक्षकांच्याही मनात स्थान मिळवले आहे.
पुष्कर सोशल मीडियावरही कायम सक्रीय असतो. त्याने वैयक्तिक आयुष्यासह आगामी चित्रपटांबद्दल केलेल्या पोस्ट्सनाही चाहते कायमच उचलून धरतात. सध्या पुष्करने केलेली एक मस्त मजेदार रील चर्चेत आहे. यात तो सध्या गाजणाऱ्या एका मराठी गाण्यावर थिरकताना दिसतो आहे.

या रिलमध्ये पुष्करचा अतिशय कूल अंदाज बघायला मिळतो आहे. 'याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं, आली वाघाची डरकाळी…' हे या आगामी सिनेमातले गाणे सध्या गाजते आहे. याच गाण्यावर ही छोटीशी रील पुष्करने केली आहे. यात पुष्करसोबत अभिनेत्री कृतिका गायकवाडसुद्धा एकदम जोशात ठुमके लावते आहे.

आगामी टाइमपास सिनेमातील हे गाणे सध्या लोकांच्या ओठांवर चांगलेच रुळले आहे. लोकप्रिय गायिका वैशाली सामंतने ठसक्यात गायलेले हे गाणे क्षितीज पटवर्धनने लिहिले आहे. अमितराज यांच्या संगीताने हे गाणे सजले आहे. या गाण्यात आपल्या वेगवान आणि मोहक अदांनी कृतिका गायकवाड मुग्ध करते आहे. तिच्यासोबत प्रथमेश परब यानेही पुरेपुर धमाल आणली आहे.

दिग्दर्शक रवी जाधव यांचा हा सिनेमा टाईमपास ३ येत्या २९ जुलैपासून रसिकांच्या भेटीला येतो आहे. प्रथमेश परब आणि ह्रता दुर्गुळे ही जोडी यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news