IND vs WI : शुभमन गिल, शिखर धवन यांची अर्धशतके | पुढारी

IND vs WI : शुभमन गिल, शिखर धवन यांची अर्धशतके

पोर्ट ऑफ स्पेन ; वृत्तसंस्था : शुभमन गिलच्या (नाबाद 98) कर्णधार धवन (58) व श्रेयस अय्यर 44) यांच्या यांच्या उपयुक्‍त फटकेबाजीच्या बळावर भारताने तिसर्‍या व शेवटच्या वन-डे सामन्यात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा 36 षटकांत 3 बाद 225 धावापर्यंत मजल मारली. पावसाने अडीच तासांचा व्यत्यय आणल्याने सामना प्रत्येकी 40 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 36 षटकांत 3 बाद 225 धावा काढल्या. सुरुवातीला शिखर धवन व शुभमन गिल यांनी सावध सुरुवात करताना पहिल्या 10 षटकांत बिनबाद 45 धावा काढल्या. धवनने मालिकेतील आपले दुसरे अर्धशतक 62 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. हे त्याच्या वन-डे कारकिर्दीतील 37 वे अर्धशतक ठरले.

20 व्या षटकात धवनने किमो पॉलच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत संघाचे व भागीदारीचे शतक पूर्ण केले. जम बसलेली ही जोडी हेडन वॉल्शने फोडताना कर्णधार धवनला निकोलस पूरनकरवी झेलबाद केले. धवनने 74 चेंडूंत 7 चौकारांसह 58 धावा काढल्या. त्याने गिलसोबत 138 चेंडूंत 113 धावांची सलामी दिली.

दरम्यान, 24 व्या षटकात जोरदार पावसाने मैदानावर हजेरी लावल्याने खेळ थांबविण्यात आला. यावेळी गिल 51 व अय्यर 2 धावांवर खेळत होते. तर टीम इंडियाच्या 1 बाद 115 अशी स्थिती होती. अडिच तासांच्या व्यत्ययानंतर सामना प्रत्येकी 40-40 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर गिल व अय्यरने आक्रमक फटकेबाजीस सुरुवात करताना27 व्या षटकात संघाचे दीडशतक पूर्ण केले. मात्र, संघाची धावसंख्या 199 असताना श्रेयस 44 धावांवर बाद झाला. त्याने गिलसोबत 86 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार 8 धावांवर परतला. अद्याप 4 षटके बाकी असताना पावसाने पुन्हा एकदा खेळात व्यत्यय आणला यावेळी गिल 98 तर सॅमसन 6 धावांवर खेळत होते.

संक्षिप्‍त धावफलक

भारत : 36 षटकांत 3 बाद 225 धावा. (शिखर धवन 58, शुभमन गिल नाबाद 98. हेडन वॉल्श 2/57.)

Back to top button