सांगली : चुकीचे वीजबिल दुरस्त करून देण्याचे महावितरणास आदेश | पुढारी

सांगली : चुकीचे वीजबिल दुरस्त करून देण्याचे महावितरणास आदेश

जत ; पुढारी वृत्तसेवा : सनमडी (ता.जत) येथील वीज ग्राहक सदाशिव विठोबा खरात यांनी वीजग्राहकांचे प्रत्यक्षातील मीटर नोंदणी नुसार वीज बिल न आकारल्याने ग्राहक तक्रार निवारण मंच कोल्हापूर या कार्यालयाकडे तक्रार केली होती. यात अवाजवी वीज आकारणी केलेले बिल देयक ४८ हजार ६७० इतकी रक्कम होती. याऐवजी सत्यता पडताळून पाहिली असता १ हजार ४० रुपये ही रक्कम खरात यांनी भरावेत असा महत्वपूर्ण आदेश ग्राहक मंचाचे अध्यक्ष रामचंद्र सरदेसाई यांनी महावितरणास दिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सनमडी येथील विद्युत ग्राहक सदाशिव खरात याचे वीज बिल देयक ४८ हजार ६७० रुपये इतकी आकारणी होऊन आले होते. प्रत्यक्षात वापर नसल्याचे खरात यांचे म्हणणे होते. त्यांनी उपविभाग संख येथे ही तक्रार दाखल केली होती परंतु दखल घेतली नाही. त्यांनी जत येथील वीज संघटनेचे हरीभाऊ खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहक तक्रार निवारण मंच कोल्हापूर येथे महावितरण विरोधात तक्रार दाखल केली. यावेळी या तक्राराची चौकशी मंचासमोर झाली. यावेळी मंचाने वीज वापराबाबत प्रत्यक्ष पाहणी करावे. अशी सूचनेनुसार कवठेमहांकाळ महावितरणचे कार्यकारी अभियता संदिप सानप व संख उपविभागाचे आशिष खेडोकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून बिल दूरस्त करून १हजार ४०रुपये इतके आकारण्यात आले. याबाबत ग्राहक मंचासमोर सादर करण्यात आलेले खरात यांच्या तक्रारीचे निवारण झाले. यामध्ये समायोजित रक्‍कम रु. ४८ हजार ७० रुपये कमी झाले. अशा प्रकारची चुकीचे बिल आकारणी मोठ्या प्रमाणात झाली असून याबाबत संघटनेकडे संपर्क साधण्याचे आवाहन खापरे यांनी केले आहे.

Back to top button