पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही दिवसात रोहित राव नरसिंगे लिखित आणि दिग्दर्शित यांचा स्टोरी ऑफ लागीर चित्रपट मराठी टेलिव्हिजन वर प्रदर्शित झाला. या चित्रपटास महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्गाने भरभरून प्रेम दिले.या नंतर लगेच रोहित राव नरसिंगे यांनी त्यांचा दुसरा चित्रपट ' लल्लाट ' या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रेक्षक वर्गाला सध्या लल्लाट हा कुतूहलाचा विषय ठरला आहे. महाराष्ट्रामधील सर्व प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढलेली दिसत आहे. हा चित्रपट मॅक फिल्म्स प्रोडक्शन आणि एम आर जोकर एन्टरटेन्मेंट या चित्रपट निर्मिती संस्थेअंतर्गत होणार आहे, अशी माहिती सध्या सोशल मीडियावर मिळत आहे. या चित्रपटाचे निर्माते महादेव अशोक चाकणकर असून लल्लाट हा चित्रपट हा त्यांचा पहिला निर्मिती करत असलेला चित्रपट आहे.
रोहित राव नरसिंगे यांच्या संकल्पनेमधील स्टोरी ऑफ लागीर या चित्रपटास प्रेक्षक वर्ग आणि रसिक वर्गाने भरभरून प्रेम दिले. त्यामुळे आगामी चित्रपट लल्लाट यात नेमक काय बघायला मिळणार? याबाबत सगळ्यांचा कुतुहुल आहे. नुकतीच लल्लाट या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
"लल्लाट" असे या चित्रपटाचे अतिशय अनोखं शीर्षक आहे. "लल्लाट" या शीर्षकाचा संबंध येथे नशिबाशी आणि त्यात एका तमाशामध्ये लावणी नृत्य करणाऱ्या मुलीच्या नशिबाशी केला आहे अस समजतं. आपलं एका श्रीमंत मुळाशी असलेलं प्रेम बाजूला ठेवून त्याच आयुष्यात कस प्रेम भरता येईल हा प्रयत्न करणाऱ्या मुलीची तसेच समाजाच्या विरुद्ध जाऊन एका तमासगीर मुलीला इज्जत देण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाचं काम यात दिसून देणार आहे. आपल्या प्रेमाची आहुती देणाऱ्या तमासगीर मुलीचा रोमहर्षक प्रेम 'लल्लाट' मध्ये पाहायला मिळणारं आहे.
मॅक फिल्मस प्रोडक्शन, ए एस डी डिझाइन आणि एम आर जोकर एन्टरटेन्मेंट निर्मिती संस्थे अंतर्गत बनत असलेला 'लल्लाट' या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन रोहित राव नरसिंगे करणार आहेत. महादेव अशोक चाकणकर, अनिल मदनसुरी आणि रोहित राव नरसिंगे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. एप्रिल २०२३ हा चित्रपट रसिक दरबारी म्हणजेच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.