इलियाना डिक्रूझचे कॅटरिनाच्या भावाशी अफेअर

इलियाना डिक्रूझचे कॅटरिनाच्या भावाशी अफेअर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री इलियाना डिक्रूझ तिच्या चित्रपटांपेक्षाही तिच्या सोशल मीडियातील सक्रिय असण्याने आणि तिच्या फिगरमुळे जास्त चर्चेत असते. आताही इलियानाचा एक फोटो सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. यात ती कॅटरिना कैफचा भाऊ सॅबेस्टियन लॉरेंट मिशेल याच्यासोबत दिसून येते. या फोटोमध्ये स्वतः कॅटरिनादेखील आहे. विशेष म्हणजे हा फोटो कॅटरिनाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा आहे. या फोटोमध्ये कॅटचा पती अभिनेत्रा विकी कौशलही आहे.

पण आता या फोटोमुळेच इलियाना आणि सॅबेस्टियन रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. लंडनमध्ये दोघांना एकत्रित फिरताना अनेकदा स्पॉट केले गेले आहे. दोघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवरही फॉलो करतात. तथापि इलियानाने तिच्या या रिलेशनशिपबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. सॅबेस्टियन हा इंग्लंडमध्ये राहतो. तो पेशाने मॉडेल आहे. कॅटरिनाच्या लग्नासाठी तो मुंबई आणि राजस्थानमध्ये आला होता.

इलियाना अनेक वर्षे ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर अँड्य्रू नीबॉन याच्याशी रिलेशनशिपमध्ये होती. दोन वर्षांपूर्वीच 2020 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले आहे. इलियानाने 'बर्फी' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यापूर्वी ती दाक्षिणात्य चित्रपटात कार्यरत होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news