तुझ्याविना काहीच शक्य नव्हतं; विराट कोहलीचा अनुष्कावर प्रेमाचा वर्षाव

विराटची अनुष्कासाठी प्रेमाने भरलेली पोस्ट; तू नसतीस तर...
Virat Kohli instagram post for Anushka Sharma
विराटने अनुष्कासाठी भावनिक पोस्ट लिहिलीVirat Kohli Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहली आणि टीम इंडियाने T20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. या विजयाच्या एका दिवसानंतर विराट कोहलीने एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये त्याने प्रेम व्यक्त केले आहे. त्याने पोस्टमध्ये सांगितले की, ती नसती तर काहीही शक्य झाले नसते.

Virat Kohli instagram post for Anushka Sharma
अभिनेते शत्रुघ्न सिन्हा कोकिलाबेन रुग्णालयात दाखल
Summary

भारताने टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर संपूर्ण देश आनंदाचा जल्लोष आहे. इंडियन क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने अभिमानास्पद एक पोस्ट लिहून ती सोशल मीडियावर शेअर केली होती. आता विराट कोहलीनेही एक प्रेमाने भरलेली पोस्ट शेअर केली आहे.

काय म्हणाला विराट कोहली?

विराट कोहलीने लिहिले, 'माझ्या प्रिये, तुझ्याशिवाय काहीही शक्य झालं नसतं. तू मला नम्रता आणि जमिनीशी जोडून ठेवण्यास प्रयत्न करतेस आणि नेहमी संपूर्ण प्रामाणिकपणे सत्य सांगतेस. हा विजय माझा आहे, तितकाचं तुझाही आहे. तुझे खूप आभार आमि तू जशी आहे, तशी असण्यासाठी मी तुझ्यावर प्रेम करतो.'

Virat Kohli instagram post for Anushka Sharma
खूपच प्रेरणादायी; बिग बीसाठी अल्लू अर्जुनची पोस्ट; २५० कोटींच्या घरात

विराटच्या या पोस्टवर अनेकांना हार्ट इमोजी शेअर केला आहे.

अनुष्का आणि विराटचा विवाह ११ डिसेंबर, २०१७ रोजी झाला. २०२१ मध्ये अनुष्काने मुलगी वामिकाला जन्म दिला. या वर्षी फेब्रुवारीमध्ये तिने आणखी एका बाळाला जन्म दिला. या जोडप्याने अद्याप आपल्या मुलांची झलक जगाला दाखवलेली नाही. ते बाळाला लाईमलाईटपासून दूर ठेवतात.

अनुष्काने २००८ मध्ये बॉलिवूड विश्वात पदार्पण केले होते. शाहरुख खानसोबत 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून तिने डेब्यू केला होता. तिचा 'चकडा एक्स्प्रेस' हा चित्रपट येणार आहे. एक अभिनेत्री असण्यासोबत ती चित्रपट निर्मातीदेखील आहे. तिने पाताललोक आणि बुलबुलची निर्मिती केली होती.

Virat Kohli instagram post for Anushka Sharma
'दुसऱ्याचा नवरा वापरते...'; कृतिका मलिकचा लग्नाबद्दल खुलासा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news