अभिनेते शत्रुघ्न सिन्हा कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

प्रकृती बिघडल्याने त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
He has been admitted to Kokilaben Hospital due to his condition deteriorating
शत्रुघ्न सिन्हा यांना प्रकृती बिघडल्याने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेPudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ठिक असून नियमित तपासणीसाठी आणल्याचे समजते याबाबतची अधिक माहिती रुग्णालय प्रशासाकडून तसेच कुटुंबियांकडून देण्यात आलेली नाही.

अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आणि अभिनेता जहीर इक्बाल यांनी 23 जून रोजी रजिस्टर लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान सोनाक्षी-जहीरच्या लग्नाला 5 दिवस झाल्यानंतर आता शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यांची मुलगी सोनाक्षी आणि जावई झहीर त्यांना पाहण्यासाठी मुंबईतील कोकिला बेन हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथला व्हिडिओही समोर आला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी चाहत्यांना नक्कीच काळजीत टाकणारी आहे, पण घाबरण्यासारखे काही नाही असे सांगण्यात आले.

He has been admitted to Kokilaben Hospital due to his condition deteriorating
नाराजी दूर! शत्रुघ्न सिन्हा आणि जहीर इकबालने एकत्र दिली पोझ (Video)

शत्रुघ्न सिन्हा यांना त्यांच्या नियमित तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. असे सांगितले जात आहे की, आधी लोकसभा निवडणूक आणि नंतर मुलगी सोनाक्षीसोबतचे लग्न यादरम्यान त्यांची खूप धावपळ झाली होती. ज्यामुळे त्याच्या शरीरावर आणि मनावर खूप ताण आला होता. त्यामुळे त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, काळजी करण्याची गरज नाही, ते पूर्णपणे ठीक असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news