'दुसऱ्याचा नवरा वापरते...'; कृतिका मलिकचा लग्नाबद्दल खुलासा

'दुसऱ्याचा नवरा वापरते...'; कृतिका मलिकचा लग्नाबद्दल खुलासा
Kritika malik- Arman Malik
'दुसऱ्याचा नवरा वापरते...'; कृतिका मलिकचा लग्नाबद्दल खुलासा Kritika malik- Arman Malik
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : यूट्यूबर अरमान मलिक नुकतेच त्याच्या दोन्ही पत्नी पायल मलिक आणि कृतिका मलिका याच्यासोबत बिग बॉस ओटीटी ३ या शोमध्ये सहभागी झाला आहे. या शोदरम्यान अरमान आणि दोन्ही पत्नींना त्याच्या आयुष्याबदद्लच्या अनेक रंजक गोष्टी विचारण्यात आल्या. यावेळी कृतिकाने नुकतेच झालेल्या अरमानसोबत लग्नाबद्दल सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असा खुलासा केला आहे. तिने केलेल्या व्यक्तव्यामुळे अरमानसह कृतिका चर्चेचा विषय बनली आहे.

लग्नाबद्दल धक्कादायक खुलासा

छोट्या पडद्यावरील बिग बॉस ओटीटी सीझन ३ च्या प्रीमियरमध्ये यूट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नीसोबत पोहोचला होता. या शोमध्ये तिघांनाही त्याच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल अनेक रंजक गोष्टीचा खुलासा केला. याआधीही अरमानची पहिली पत्नी पायल ही कृतिका आणि अरमानच्या लग्नाबद्दल अनेक वेळा दु:ख व्यक्त करताना दिसली होती. आता त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिकने स्वत: च्या लग्नाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. यावेळी केलेल्या व्यक्तव्याने ती खूपच चर्चेत आली आहे.

Kritika malik- Arman Malik
Koffee With Karan 8 : लग्नाबद्दल कियाराचा मोठा खुलासा; सिद्धार्थविषयी म्हणाली…

मी दुसऱ्याचा नवरा वापरते

या शोमध्ये कृतिका अरमान मलिक याचा टॉवेल वापरताना दिसली. यावर पोलोमी दासने कृतिकाला विचारले की, 'तू पतीचा टॉवेल वापरतेस', 'तुला तुझा टॉवेल नाही?', 'तुम्ही एकमेकांचे टॉवेल वापरतात काय?' असे प्रश्न विचारते. यावेळी कृतिका सडेतोड उत्तर देताना म्हणते की, 'अरे मी दुसऱ्याचा नवरा वापरत आहे तर, ही टॉवेल काय गोष्ट आहे.' यानंतर ती पुढे ती स्वत:चीच आता बेईज्जत करून घेण्यासाऱखा प्रकार आहे असेही म्हणते. कृतिकाचे हे बोलणे ऐकूण पोलोमी दास गप्प बसते. आणि अरमान मलिक एकटक तिच्याकडे पाहत राहतो. ही माहिती सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे. यामुळे कृतिका हिला नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.

Kritika malik- Arman Malik
‘सासू माझा मेकअप वापरते, मला घटस्‍फोट हवा’ : विवाहितेची अजब मागणी

अरमानने पहिली पत्नी पायल मलिकसोबत घटस्फोट न घेताच कृतिकाशी दुसरं लग्न केलं आहे. पायलला दोन मुले आणि एक मुलगी आहे. तर कृतिकाला एक मुलगा आहे. विशेष म्हणजे, अरमान मलिक, कृतिका आणि पायल हे एकाच घरात राहतात. या लग्नानंतर पायलने अनेक वेळा सोशल मीडियावर आपलं दुख व्यक्त केलं होतं.

Kritika malik- Arman Malik
अभिनेत्री कनिष्काचा धक्कादायक खुलासा, ‘लिव्ह इन’मध्‍ये असताना लग्नाबद्दल विचारंल आणि…;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news