पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेता प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाला चाहत्यांचा खूपच प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील प्रत्येक भूमिकेचे चाहत्यांसह बॉलिवूड, हॉलिवूड स्टार्संनीही भरभरून कौतुक केले आहेत. दरम्यान रजनीकांत, चिरंजीवी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी 'कल्की' चित्रपटातील ॲक्शन ड्रामा पाहून भारावून गेलं आहेत. दरम्यान पुष्पा फेम आणि साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनने भल्ली मोठी पोस्ट शेअर करत बिग बी अमिताभ बच्चन यांची कामगिरीबद्दल प्रेमाचा वर्षाव केलाय.
अभिनेता अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर 'कल्की 2898 एडी' या चित्रपटातील कलाकारांचे अभिनंदन करताना एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय आहे की, ''#Kalki2898AD टीमचे अभिनंदन. मस्त ॲक्शन सीन आणि धमाकेदार परफार्मन्स. या चित्रपटात महाकाव्याला आणखी सशक्त बनवल्याबद्दल माझा प्रिय मित्र प्रभास गारु यांचे अभिनंदन. अमिताभ बच्चन जी, तुम्ही खूपच प्रेरणादायी आहात... शब्द नाहीत. अभिनेता कमल हसन सरांना सलाम, भविष्यात आम्ही एकत्रित येण्याची आशा आहे. प्रिय दीपिका पादुकोण, तुम्ही आश्चर्यचकित केलं आहे. दिशा पटानी यांची उपस्थिती अनोखी. तसेच विशेषत: सिनेमॅटोग्राफी, आर्ट, कॉस्च्युम, ॲडिटिंग आणि मेकअअप या सर्व कलाकारांचे आणि क्रू मेंबर्सचे अभिनंदन.''
नाग अश्विन गारू यांनी या भारदस्त चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. अल्लू अर्जूनची पत्नी स्नेहा रेड्डीने तिच्या इंस्टाग्रामवर या चित्रपटातर्जकाही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये तिच्यासोबत दिग्दर्शक नाग अश्विनही दिसत होते. चित्रपटात एसयूएम-80 च्या भूमिकेत दीपिका पादुकोण, भैरव आणि कर्णच्या भूमिकेत अभिनेता प्रभास, अश्वत्थामाच्या भूमिकेत अमिताभ बच्चन आणि सुप्रीम कार्टाचे न्यायाधीश यास्किनच्या भूमिकेत कमल हासन दिसले आहेत.
कल्की 2898 AD ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सर्व भाषांमध्ये एकूण ९५.३ कोटी रुपयांची कमाई केली. तेलगू भाषेत सर्वाधिक बुकिंग म्हणजे, ६५.८ कोटी रूपयांचे झाले. तर हिंदीत २२.५ कोटी कमावले. दुसऱ्या दिवशी प्रभासच्या चित्रपटाच्या कमाईत थोडी घट पाहायला मिळाली. तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाला विकेंटटचा फायदा झाला आणि चित्रपटाने देशभरात एकूण ६७.१ कोटींची कमाई केली.
तेलगूमध्ये सर्वाधिक ३२.२५ कोटी, तमिळमध्ये ५ कोटी, हिंदीमध्येक२७ कोटी, कन्नडमध्ये ०.४५ कोटी आणि मल्याळममध्ये २.४ कोटी मिळविले. दरम्यान चित्रपटाने बॉक्स आफिसवर आतापर्यंत एकूण २२० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर या चित्रपटाचे जगभरात ( वर्ल्डवाईड ) एकूण २५० कोटींच्या घरात पोहोचला आहे.