bbm 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार ‘संयमाची ऐशी तैशी ‘

bbm 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार ‘संयमाची ऐशी तैशी ‘
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बिग बॉस मराठीच्या ( bbm 3 ) घरात 'संयमाची ऐशी तैशी' साप्ताहिक कार्य हा टास्क चाहत्याचे मनोरंजन करत आहे. आता या टास्कमध्ये कोण संयम बाळगणार? आणि कोणाचा संयम तुटणार? यांची चाहत्यांना उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बिग बॉस मराठीच्या घराचे रूपांतर काल अद्भुत नगरामध्ये करण्यात आले. त्याचा राजा म्हणून बिग बॉस यांनी 'संतोष चौधरी' म्हणजेच दादूस यांची निवड केली. त्यांच्यासोबत तीन सल्लागार म्हणून स्नेहा वाघ, गायत्री दातार आणि विशाल निकम निवड केली गेली.

"स्वर्ग की नरक" या नॉमिनेशन टास्क नुकताच बिग बॉस मराठीच्या घरात पार पडला. यामध्ये स्वर्गात उत्कर्ष, तृप्तीताई, मीनल आणि मीरा तर बिग बॉस यांनी दिलेल्या दंडामुळे स्नेहा वाघ, विशाल निकम, गायत्री दातार थेट नॉमिनेट झाले. याशिवाय नरकात म्हणजेच या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी जय दुधाणे, आविष्कार दारव्हेकर, विकास पाटील, सोनाली पाटील हे देखील नॉमिनेट झाले.

आज घरामध्ये पार पडणार आहे ' संयमाची ऐशी तैशी हे साप्ताहिक कार्य.' आता या टास्कमध्ये कोण संयम बाळगणार ? आणि कोणाचा संयम तुटणार? हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. आज बिग बॉस घरात A आणि B असे दोन टीममध्ये विभाजन केलं जाणार आहे. बघूया काय होणार आजच्या भागामध्ये. बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : बहुरंगी कलाकार EP 1 : अभिनयाबरोबरच प्रार्थना बेहरेची अनोखी कलाकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news