Sharib Hashmi Wife Cancer: ती अजूनही लढतेय... शारीब हाश्मीच्या डोळ्यात पाणी; पत्नीचा कॅन्सर सहाव्यांदा परतला

Sharib Hashmi Wife Cancer: ‘द फॅमिली मॅन’मधील अभिनेता शारिब हाशमी यांनी पत्नी नसरीन यांचा कॅन्सर सहाव्यांदा परत आल्याची माहिती दिली आहे. २०१८ पासून त्या तोंडाच्या कॅन्सरशी झुंज देत असून, आतापर्यंत पाच शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
Sharib Hashmi Wife Cancer
Sharib Hashmi Wife CancerPudhari
Published on
Updated on

Sharib Hashmi Reveals Wife’s Cancer Returned Sixth Time: ‘द फॅमिली मॅन’ मालिकेत जेके तळपदेची भूमिका साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता शारीब हाश्मी सध्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या कठीण प्रसंगातून जात आहे. त्याची पत्नी नसरीन हाश्मी यांना पुन्हा एकदा कॅन्सरचा सामना करावा लागत असून, हा आजार आता सहाव्यांदा परत आल्याची माहिती स्वतः शारीब यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, यावेळी हा कॅन्सर अधिक आक्रमक स्वरूपात असून शरीरात पसरल्याचे त्यांनी सांगितले.

अलीकडेच एका पॉडकास्ट मुलाखतीत शारीब आणि त्यांची पत्नी नसरीन यांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षांबद्दल खुल्या मनाने संवाद साधला. २०१८ मध्ये नसरीन यांना तोंडाच्या कॅन्सरचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांनी या गंभीर आजाराशी पाच वेळा झुंज दिली आहे. अनेक शस्त्रक्रिया, उपचार आणि मानसिक संघर्ष यांचा सामना करत त्या आजवर लढत राहिल्या आहेत.

या मुलाखतीदरम्यान शारीब यांनी सांगितले की, “नसरीनची आतापर्यंत पाच वेळा सर्जरी झाली आहे. पाच वेळा हा आजार पुन्हा परत आला. आता सहाव्यांदा तो परत आला आहे आणि यावेळी तो शरीरात पसरला आहे. मात्र उपचार सुरू आहेत आणि आम्हाला आशा आहे की हा टप्पाही निघून जाईल.”

पत्नीच्या धैर्याबद्दल बोलताना शारिब भावूक झाले. त्यांनी सांगितले की, ज्या पद्धतीने नसरीन या आजाराचा सामना करत आहेत, त्यामुळे संपूर्ण कुटुंबालाच धीर मिळतो. “कॅन्सर खूप आक्रमक स्वरूपाचा आहे, त्यामुळे तो वारंवार परत येतो. पण त्यानंतरही ती ज्या हिंमतीने लढते, ते पाहून आम्हालाही ताकद मिळते,” असे ते म्हणाले.

Sharib Hashmi Wife Cancer
War Impact: काळ मोठा कठीण! युद्धामुळे जगभरातील देशांनी काय पावलं उचलली?

नसरीन यांनीही या कठीण काळात शारीब यांच्या संघर्षाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, शारीब नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहिले. शूटिंगमध्ये कितीही व्यस्त असले तरी ते वेळ काढून रुग्णालयात पोहोचत असत. रुग्णालयात दाखल झाल्यापासून डिस्चार्ज मिळेपर्यंत ते त्यांच्यासोबतच थांबत, त्यामुळे मानसिक आधार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Sharib Hashmi Wife Cancer
Raja Shivaji BO: ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर तुफान घोडदौड; ऐतिहासिक विक्रमापासून फक्त काही पावले दूर, किती कोटी कमावले?

शारीब यापूर्वीही अनेक मुलाखतींमध्ये पत्नी नसरीन यांना आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगत आले आहेत. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा कुटुंबातील अनेकजण विरोधात होते. मात्र पत्नीने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. एवढेच नाही, तर कठीण काळात घर चालवण्यासाठी नसरीन यांनी स्वतःचे दागिने विकल्याचाही खुलासा शारीब यांनी केला होता.

Sharib Hashmi Wife Cancer
Air India Flights: एअर इंडियाचा मोठा निर्णय; अनेक आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स केल्या बंद, कोणते मार्ग प्रभावित होणार?

२००३ मध्ये शारीब आणि नसरीन यांनी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शारीब हाश्मी यांचा हा संघर्ष सध्या अनेकांना भावूक करत आहे. त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीसाठी चाहते प्रार्थना करत असून, या कठीण लढाईत हे कुटुंब पुन्हा एकदा धैर्याने उभे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news