Raja Shivaji BO: ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर तुफान घोडदौड; ऐतिहासिक विक्रमापासून फक्त काही पावले दूर, किती कोटी कमावले?

Raja Shivaji Box Office Collection Day 12: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ चित्रपट मराठी सिनेमात नवा इतिहास रचत असून १२ दिवसांत भारतात ७२.१३ कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे.
Raja Shivaji Box Office Collection Day 12
Raja Shivaji Box Office Collection Day 12Pudhari
Published on
Updated on

Raja Shivaji Box Office Collection Day 12: रितेश देशमुखचा महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचताना दिसत आहे. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत आधीच इतिहास घडवला असून, आता आणखी एका मोठ्या टप्प्याच्या जवळ पोहोचला आहे. भारतातील नेट कलेक्शनमध्ये ७५ कोटींचा आकडा गाठण्यासाठी चित्रपटाला आता अवघ्या काही कोटींची गरज आहे.

पहिल्या आठवड्यातच ‘राजा शिवाजी’ने तब्बल ५२.६५ कोटी रुपयांची कमाई केली होती. पहिल्याच दिवशी ११.३५ कोटींची ओपनिंग मिळवत हा चित्रपट मराठी सिनेमातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. पहिल्या वीकेंडला चित्रपटाने ३३.९० कोटींचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे सोमवारच्या दिवशीही चित्रपटाने ५.६० कोटींची कमाई करत मराठी चित्रपटांचा जुना विक्रम मोडला.

दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची घोडदौड कायम राहिली. आठव्या दिवशी ३.२० कोटी, नवव्या दिवशी ५.६० कोटी, तर दहाव्या दिवशी ६.८० कोटींची दमदार कमाई झाली. रविवारी प्रेक्षकांची मोठी गर्दी झाल्यानंतर सोमवारी अर्थात ११व्या दिवशी कमाईत काहीशी घसरण झाली आणि चित्रपटाने २.४० कोटी रुपये कमावले. मात्र, ही घसरण अपेक्षित असल्याचे ट्रेड विश्लेषकांचे मत आहे.

आता १२व्या दिवसाच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, ‘राजा शिवाजी’ने १.४८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह चित्रपटाची एकूण भारतातील नेट कमाई ७२.१३ कोटी रुपयांवर पोहोचली असून, ग्रॉस कलेक्शन ८५.५५ कोटींवर गेले आहे. अंतिम आकडेवारीनंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भाषेनुसार पाहिल्यास, १२व्या दिवशी मराठी व्हर्जनने १.१२ कोटींची कमाई केली, तर हिंदी व्हर्जनमधून ०.३६ कोटी रुपये मिळाले आहेत. यावरून चित्रपटाला महाराष्ट्राबाहेरही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या आयुष्यावर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटात रितेशने साकारलेली शिवरायांची भूमिका विशेष चर्चेत आहे. त्याचबरोबर संजय दत्त यांनी अफझल खानची भूमिका साकारली आहे, तर अभिषेक बच्चन यांनी संभाजी शहाजी महाराज यांची भूमिका केली आहे. जेनेलिया देशमुख महाराणी सईबाईंच्या भूमिकेत दिसत आहेत.

Raja Shivaji Box Office Collection Day 12
Cannes Film Festival: पुणेकर दीक्षाची ‘कान्स’भरारी! ‘जीव’ चित्रपटाची प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड

चित्रपटातील आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे सलमान खानचा जीवामहालाच्या भूमिकेतील कॅमिओ. त्याचा “शिवाजी नाही, शिवाजी राजे म्हणायचं” हा डायलॉग थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या मिळवत आहे. तसेच रितेश आणि जिनिलियाचा मुलगा राहिल देशमुखने बाल शिवाजीची भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

Raja Shivaji Box Office Collection Day 12
Rinku Rajguru-Akash Thosar new look|‘सैराट’ची जोडी आजही तितकीच याड लावणारी! आर्ची-परश्याची पुन्हा झिंगाट केमिस्ट्री चर्चेत

एकंदरीत, ‘राजा शिवाजी’ केवळ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत नाही, तर मराठी सिनेमासाठी नवा बेंचमार्क तयार करत असल्याचं चित्र दिसत आहे. आता चित्रपट ७५ कोटी नेट क्लबमध्ये कधी प्रवेश करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news