War Impact: काळ मोठा कठीण! युद्धामुळे जगभरातील देशांनी काय पावलं उचलली?

प्रत्येक देश सावध होत पुढल्या हाका ऐकतो आहे... काळ मोठा कठीण आलाय, हे जाणून एक ना अनेक उपाय करतो आहे. त्यावर हा पुढारीचा दृष्टीक्षेप-
War Impact
War ImpactPudhari
Published on
Updated on

काळ मोठा कठीण आला

काटकसरीने वागा, बचत करा अशी हाक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिली, आणि त्यावर साधक-बाधक चर्चा उठली. लोक बाजूने उभे राहिले आणि विरोधातही बोलू लागले. मात्र जगभरात काय सुरू आहे? प्रत्येक देश सावध होत पुढल्या हाका ऐकतो आहे... काळ मोठा कठीण आलाय, हे जाणून एक ना अनेक उपाय करतो आहे. त्यावर हा पुढारीचा दृष्टीक्षेप-

आणीबाणी घोषित

मादागास्कर (15 दिवस ), मार्शल आयलंड्स (90 दिवस), तुवालू (एका बेटावर 2 आठवडे), फिलिपिन्स / श्रीलंका इथे राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी-

कुलिंग मर्यादा:

वीज वाचवण्यासाठी कार्यालये आणि सार्वजनिक इमारतींमधील तापमानाची विशिष्ट पातळी अनेक देशांनी निश्चित केली, ती अशी-

  • बांगलादेश (25)

  • सिंगापूर (25;पंख्यांच्या वापराला प्राधान्य)

  • कंबोडिया (24-25)

  • मलेशिया (24)

  • श्रीलंका (26)

  • थायलंड (26)

  • जॉर्डन (सार्वजनिक कार्यालयांमध्ये एसी वापरण्यास बंदी)

विशिष्ट निर्बंध:

एलपीजी सिलिंडर अर्धेच भरून देणे (मालदीव, नेपाळ), बाजारपेठा बंद ठेवणे (पाकिस्तान), जाहिरातींचे फलक (बिलबोर्ड) प्रकाशित करणारे दिवे बंद ठेवणे (इजिप्त, श्रीलंका).

सरकारी प्रवासावर निर्बंध:

  • सरकारी हवाई/रस्ते

  • प्रवास आणि आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवर मर्यादा-

  • जॉर्डन (तात्पुरती बंदी)

  • पाकिस्तान (परदेश प्रवासावर बंदी)

  • इजिप्त

  • इंडोनेशिया

  • मलेशिया

  • कोरिया (सार्वजनिक क्षेत्रासाठीसम-विषमपद्धत)

  • पनामा

  • टांझानिया (सामूहिक बस प्रवास)

War Impact
Mumbai Firing News: गुंड आसिफ दाडीच्या मुलावर मुंबईत अज्ञाताकडून गोळीबार

घरून काम/ लवचिक व्यवस्था:

अनेक देश सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्यास प्रोत्साहन देत आहेत किंवा अनिवार्य करत आहेत. खाजगी क्षेत्रांनाही वर्क फ्रॉम होमची हाक देत आहेत -

  • पाकिस्तान: 4 दिवसांचा कामाचा आठवडा + 50% दूरस्थ पद्धतीने काम

  • इंडोनेशिया: शुक्रवारी घरून काम

  • श्रीलंका: बुधवारी कार्यालये बंद

  • कोरिया: लवचिक व्यवस्था

  • कंबोडिया

  • लाओ पीडीआर

  • मलेशिया

  • फिलिपिन्स

  • थायलंड

  • व्हिएतनाम,पेरू,इजिप्त

वाहतूक व इंधन उपाय:

पेट्रोल-डिझेल, गॅसच्या रेशनिंगसह अनेक देशांत वाहतूक घटवणारे विविध प्रयोग सुरू झाले आहेत -

  • कोरिया: सम-विषम क्रमांकांनुसार वाहनबंदीचे दिवस

  • श्रीलंका: क्यू आर कोड-आधारित इंधनाचे रेशनिंग

  • म्यानमार: एक दिवसा आड इंधन + जुन्या वाहनांच्या बदल्यात ईव्ही खरेदीची सवलत

  • बांगलादेशः इंधनावर मर्यादा

  • पाकिस्तान: मोफत सार्वजनिक वाहतूक,वेगमर्यादा

  • इंडोनेशिया: जैवइंधन आणि इलेक्ट्रिक वाहनांवर सवलती

War Impact
JJ Hospital resident doctor death: जे. जे.मध्ये 26 वर्षीय निवासी डॉक्टरने संपवलं आयुष्य

शाळा आणि विद्यापीठे:

शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यापासून ऑनलाइन तासिका घेण्यापर्यंत काटकसर कॅम्पसमध्येही सुरू झाली आहे -

  • बांगलादेश: सर्व विद्यापीठे बंद

  • श्रीलंका: बुधवारी शैक्षणिक सुट्टी

  • पाकिस्तान: 100% ऑनलाइन शिक्षण

उर्जेचा वापर:

सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी,एलईडी दिव्यांचे आधुनिकीकरण, हीट पंपांसाठी अनुदान ः ब्रिटन , नेदरलँड्स, स्पेन

ईव्ही -विद्युत वाहने स्वीकारण्यावर भर ःफ्रान्स, ब्रिटन, चिली, कंबोडिया, म्यानमार, थायलंड

छोट्या गोष्टींची मोठी मदत

छोट्या -छोट्या गोष्टींची मदतही राष्ट्राला मोठी मदत करू शकते, हा मंत्र लक्षात ठेवत अनेक देशांनी काही प्रयोग चालवले आहेत. त्यावर ही एक नजर-

जागतिक ऊर्जा संकटावर तोडगा म्हणून युरोपसह 40 देशांनी आपत्कालीन ऊर्जा बचत उपाय स्वीकारले आहेत. सरकारी खर्चांना, सवलतींना कात्री आणि प्रवासावरही निर्बंध आणले आहेत. खाद्यतेल/एलपीजीचा वापर घटवणारे निर्णय घेतले आहेत. त्यात इंधनाचे रेशनिंग आहे, वेग मर्यादा आहे, स्वतःचे वाहन एक दिवसाआड चालवण्याची सक्ती आहे, 13 देशांनी वर्क फ्रॉम होम आणि दूरस्थ पद्धतीने काम करणे स्वीकारले. 35 हून अधिक देशांनी इंधन वापर घटवला.

  • कंबोडिया : सरकारी मालकीची वीज कंपनी जनतेला विजेचा वापर कमी करण्याचे आवाहन करत आहे.

  • कोरिया : व्यावहारिक बचतीच्या कृतींवर सार्वजनिक मोहीम सुरू आहे.

  • सिंगापूर ः“चला एकत्र ऊर्जा वाचवूया” मोहीम सुरू. क्लायमेट व्हाउचर‌’ योजनाही आणली.

  • नेदरलँड ः राष्ट्रीय तेल संकट योजनेचा पहिला टप्पा सुरू. सौर पीव्ही, गॅस बॉयलरच्या जागी हीट पंप बसवण्याची मोहीम.

  • पाकिस्तान ः कोणतेही भोजनाचे कार्यक्रम नाहीत, प्रत्यक्ष बैठका नाहीत. रात्री 8 पासून बाजारपेठा आणि व्यावसायिक केंद्रांचे काम बंद. तसेच रात्री 10पासून खाद्यपदार्थ विक्री आणि कार्यक्रमांची ठिकाणे बंद .

  • मादागास्कर : 15दिवसांसाठी देशव्यापी ऊर्जा आणीबाणी जाहीर.

  • थायलंड : कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मागणी मर्यादित. ग्रामीण भागातील रस्त्यांवरील दिवे कमी केले.

  • ब्रिटन ः एलपीजी- किंवा तेल-आधारित हीटिंगवरून हीट पंप आणि इतर घरगुती उपकरणांसाठी अनुदानात वाढ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news