Nana Patekar Death: नाना पाटेकरांचे खरंच निधन झाले आहे...? तुम्हाला सांगितलं तुम्ही ऐकलं; तनुश्री दत्ता नेमकं काय म्हणाली?

Nana Patekar Death Controversy: तनुश्रीने आपल्या लाईव्हमध्ये नाना पाटेकर यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका व्यक्त केल्या आहेत.
Nana Patekar Death
Nana Patekar DeathPudhari
Published on: 
Updated on: 

Nana Patekar Death Controversy: प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनावर पुन्हा एकदा वादग्रस्त अभिनेत्री तनुश्री दत्ताने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने इन्स्टा लाईव्ह करत हे प्रश्न विचारले आहे. नाना पाटेकरांच्या मृतदेहावारील अंत्यसंस्कार आणि त्यांच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त केली आहे.

Nana Patekar Death
Nana Patekar Memories | "नाना आमच्या घरातलेच होते!" ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आठवणींना सलिल सावकार यांनी दिला उजाळा

शोक सभा का ठेवली नाही

तनुश्री दत्ताने इन्स्टाग्राम लाईव्ह करत नाना पाटेकर यांच्यावर रात्रीच्या अंधारात घाई घाईत अंत्य संस्कार का करण्यात आले. त्यांच्यासाठी शोक सभा का ठेवण्यात आलेली नाही. त्यांचा मृतदेह इंडस्ट्रीमधील कोणत्याही व्यक्तीला का दाखवण्यात आला नाही असे प्रश्न विचारले.

Nana Patekar Death
Nana Patekar Death News | अभिनेते नाना पाटेकर यांचा मृत्यू नैसर्गिकच; गोमेकॉच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट

नाना जिवंत आहेत का?

तनुश्रीने आपल्या लाईव्हमध्ये नाना पाटेकर यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका व्यक्त केल्या. या व्हिडिओत ती अंत्य संस्कार करण्याची एवढी घाई का होती. हिंदू रितीरिवाजाप्रमाणे सूर्यास्तानंतर अंत्य संस्कार करत नाहीत. नानांवर रात्रीच अंत्यसंस्कार का केले.

तनुश्री म्हणते, नाना पाटेकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करताना व्हिडिओग्राफी करण्यात आली होती का? शवविच्छेदनाची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली पाहिजे. काय माहिती त्यांचे निधन खरोखरच झालं आहे की नाही. तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही ऐकलं. कोणी नानांचे पार्थिव पाहिले का. त्यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह व्यवस्थित पाहिला का, अंतिम संस्कार कोणाचे झाले. चेहरा तर झाकला होता.

Nana Patekar Death
Nana Patekar : ‘नाना पाटेकरांना पितळी कुकर द्यायचा राहून गेला’, शेफ विष्णू मनोहर यांनी शेअर केले नानांसोबतचे संभाषण!

नाना सिंगापूर, मलेशियात असू शकतात

गावकरी काही प्रश्न विचारणार नाहीत. मात्र हुशार लोकं हा प्रश्न विचारणार, बॉलीवूडच्या लोकांनी जर अंत्य दर्शन घेतलं असतं तर त्यांना चेहरा दाखवा असं सांगितलं असतं. तनुश्रीने नाना पाटेकर अजून जिवंत असल्याचा दावा करत आहे. नाना पाटेकर सिंगापूर किंवा मलेशियात असू शकतात. तनुश्रीने दावा केला आहे की आपण नाना पाटेकरांवर केलेले आरोप आणि कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी नाना पाटेकरांनी मृत्यूचं नाटक केलं आहे. खोटा मृत्यूचा दाखला तयार केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news