

Nana Patekar नाना पाटेकर यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील अनेक कलावंत, मराठी माणूस, सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना धक्का बसला आहे. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने नांनांना श्रद्धांजली वाहत आहेत. अनेक लोक त्यांच्यासोबतचे किस्से शेअर करत आहेत. नानांना जेवण बनवण्यात व ते मित्रांना खाऊ घालण्यात विषेश आनंद मिळत असे. अनेकांना नानांच्या डोणजे या गावात पाहूणचार अनुभवला आहे. नानांची याच गुणांमुळे शेफ विष्णू मनोहर यांच्याशी मैत्री होती. आता मनोहर यांनी त्यांच्या एका जुन्या फोनवरील संभाषणाचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी नाना पाटेकर यांची आठवण सांगितली आहे.
नानांसाठी ठेवलेला पितळी कुकर द्यायचा राहून गेला!
‘नानांच पितळी भांड्यावर खुप प्रेम आज आपल्यासोबत ते नाहीत पण त्यांच्या आठवणी आपल्यासोबत कायम राहतील मिस यु नाना..’ अशा आशयाची पोस्ट करत विष्णू मनोहर यांनी नानांना श्रद्धांजली वाहिली आहे. नानांच जुन्या भांड्यावर खूप प्रेम होतं जुने पारंपरिक पदार्थ जुनी भांडी आणि जशी मला आवड म्हणजे मला फक्त दुःख एकच आहे की हा कुकर मी नानांसाठी ठेवला होता तो फक्त देता आला नाही. असे विष्णू मनोहर यांनी म्हटले आहे.
पितळी जुनी भांडी नानांच्या विशेष आवडीची
पुढे त्यांनी सांगितले की नानांच जुन्या भांड्यांवरच प्रेम एवढं होतं की ते फोनवर दोन दोन चार चार मिनिटात त्याच्याबद्दल बोलत बसायचे. त्यांना अनेक पितळी भाडंयाची नावे तोंडपाठ होती हे या फोनवरील संभाषणातून लक्षात येते. विष्णू मनोहर व नाना यांच्यात जिव्हाळयाचे संबध होते. ते विषेश पदार्थ तयार केला की नानांसाठी पाठवायचे. तसचे या संभाषणात नाना पाटेकर विष्णू मनोहर यांच्यावर चिडलो आहे असे म्हणताना दिसत आहेत ’मी मागितलेली पितळी भांडी तू अजून दिलेली नाहीस’ असेही म्हणताना दिसत आहेत.
कळशी, हंडे, तपेली, घडवंची, डाव, अडकित्ता, शिंकाळे
नाना पाटेकरांच्या फोनवरील संभाषणातून असे लक्षात येते की नानांना जून्या भांड्यांवर विषेश प्रेम होते असे दिसून येते. तसेच त्यांच्या प्रत्येक क्षेत्रातील माहितीचीही चूणूक दिसून येते. नाना बोलताना त्यांनी जुन्या पितळी भांड्यांचे नाव अस्खलित घेतली आहेत, पितळी कळशी, हंडे, तपेली, घडवंची, डाव, तांबे, पळी, ही सर्व भांडी पाठवून दे असे विष्णू मनोहर यांना नाना पाटेकर सांगताना दिसत आहेत. आपल्या संस्कृतीबद्दल नानांना किती आत्मियता होती हे यातून दिसून येते.
जूना अडकित्ते असेल तर पाठवा, तर मनोहर अडकित्ता जूना नाही नवा असल्याचे सांगतात तसेच शिंकाळे ही असेल तर तेही पाठवून दे असे सांगतात. विष्णू मनोहर त्यांना नागपूरला येऊन जावा असा आग्रह करतात. त्यावेळी ते नागपूरला नक्की येईन असे नाना पाटेकर म्हणतात.