Nana Patekar Death News | अभिनेते नाना पाटेकर यांचा मृत्यू नैसर्गिकच; गोमेकॉच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट

Nana Patekar Death News | हदयविकाराचा तीव्र झटका; गोमेकॉ शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट
Nana Patekar
Nana PatekarFile Photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

अभिनेते नाना पाटेकर (वय ७५) यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ), बांबोळी येथील डॉक्टरांच्या पॅनेलने हा अहवाल जारी केला असून त्यात मृत्यू नैसर्गिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Nana Patekar
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनरी आर्टरी डिसीजमुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य धमनीत रक्ताची गुठळी निर्माण झाली. त्यामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. ८ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ५.३० वाजता दोनापावला येथील मनिपाल रुग्णालयातून नाना पाटेकर यांना मृतावस्थेत आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आला. तिथे साक्षीदार व पाटेकर यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांच्या पॅनेलने शवविच्छेदन करून अहवाल जारी केला.

पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांनी ८ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता कौटुंबिक मित्र अमेय नाईक यांना व्हॉट्सॲप संदेश पाठवून आपली प्रकृती ठीक नसल्याचे कळवले होते. पहाटे सुमारे ३.३० वाजता नाईक यांनी संदेश पाहिल्यानंतर तातडीने दोनापावला येथील त्यांच्या फ्लॅटवर धाव घेतली. त्यावेळी नाना पाटेकर बेशुद्ध पडले होते.
नंतर नाईक यांनी केअरटेकरला मनिपाल रुग्णालयाकडून वाहनाची व्यवस्था करण्यास सांगितले. आपत्कालीन वाहन आल्यानंतर पहाटे सुमारे ४.३० वाजता नाना पाटेकर यांना दोनापावला येथील मनिपाल रुग्णालयात नेण्यात आले.

Nana Patekar
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी नाना पाटेकर यांचे पुतणे प्रसाद पाटेकर आणि त्यांचे पुत्र मल्हार पाटेकर यांचे जबाब नोंदवले. दोघांनीही मृत्यूबाबत कोणताही घातपात झाल्याचा संशय नसल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. पणजी पोलिस निरीक्षकांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news