Nana Patekar Memories | "नाना आमच्या घरातलेच होते!" ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आठवणींना सलिल सावकार यांनी दिला उजाळा

Nana Patekar Memories | सलिल सावकार यांनी जागवल्या नाना पाटेकर यांच्या आठवणी
Nana Patekar
Nana PatekarFile Photo
Published on: 
Updated on: 

पणजी : क्रांतिराज सम्राट

आपल्या दमदार अभिनयाने आणि अजोड संवादफेकीने भारतीय चित्रपटसृष्टीवर वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसबली आहे. गोव्यातील दिवंगत ज्येष्ठ अभिनेते पं. प्रसाद सावकार यांचे पुत्र सलिल सावकार यांनी नाना पाटेकर यांच्याशी असलेल्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या आठवणींना उजाळा दिला.

Nana Patekar
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

सलिल सावकार म्हणाले, बाबा आणि नाना या दोघांनाही कलाक्षेत्राचा दांडगा अनुभव आणि सखोल माहिती होती. नाना घरी आले की बाबांशी गप्पांचे फड रंगायचे. नट, कलाकार, जुनी गाणी, गायन आणि कलाक्षेत्रातील विविध विषयांवर तासनतास चर्चा व्हायची.
नाना आणि सावकार कुटुंबाचे नाते केवळ परिचयापुरते मर्यादित नव्हते.

मुंबईत राहत असताना आम्ही एकत्र क्रिकेट खेळायचं. आमच्या घरी अनेकदा स्नेहमेळावे व्हायचे. नानांचा 'अंकुश' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासून आमची ओळख होती, असे त्यांनी सांगितले. नानांना वाचनाची प्रचंड आवड होती. सलिल यांच्या आईलाही वाचनाची आवड असल्याने दोघांमध्ये मराठी साहित्यावर सखोल चर्चा व्हायची.

Nana Patekar
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

नानांच्या साधेपणाची आठवण सांगताना सलिल म्हणाले, नाना मोठे आणि प्रसिद्ध अभिनेते असले, तरी आमच्या घरी आले की घरातलेच होऊन जायचे. त्यांचे राहणीमान साधे आणि स्वभाव रांगडा होता. एकदा पुण्यात मित्राकडे गेलो असताना त्यांना फोन केला. ते जवळच्या फार्मवर होते.

त्यांनी मला तिथे बोलावले आणि स्वतःच्या हाताने मटण व मासे बनवून आम्हाला प्रेमाने जेवू घातले. त्यांनी येथे अनेक मित्र जोडले. सर्वसामान्यांशीही ते सहज मैत्री करायचे. मुरुड येथे त्यांचे जुने घर होते. तिथेच वाढल्यामुळे त्यांना समुद्राची विशेष आवड होती. त्यामुळे त्यांनी गोव्यात प्रथम फ्लॅट घेतला.

मात्र, समुद्राचे दर्शन घडावे, या इच्छेने अलीकडेच समुद्रदृश्य असलेला दुसरा फ्लॅट घेतल्याचे सलिल यांनी सांगितले. नानांच्या निधनाने सच्च्या कलाकारासह कुटुंबातील माणूस गमावल्याची भावना सलिल सावकार यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news