स्वराज्य सौदामिनी ताराराणी : छत्रपती शिवरायांना मानवंदना

स्वराज्य सौदामिनी ताराराणी : छत्रपती शिवरायांना मानवंदना
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

शिवरायांस आठवावे । जिवित्व तृणवत मानावे ।
इहलोकी परलोकी रहावे । किर्तीरूपी ।।
शिवरायांचे कैसे चालणे । शिवरायांचे कैसे बोलणे ।
शिवरायांचे सलगी देणे कैसे असे ।।
शिवरायांचे आठवावे रूप ।शिवरायांचा आठवावा प्रताप
शिवरायांचा आठवावा साक्षेप। भूमंडळी ।।

समर्थांच्या या ओळीतून छत्रपती शिवाजी महाराज यांची महती स्पष्ट होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या कर्तुत्वाला आणि दातृत्वाला मानवंदना देण्यासाठी स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेच्या कलाकारांनीही सेटवर आगळी शिवजयंती साजरी केली. दांडपट्टा, काठीचे खेळ इत्यादी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके यावेळी लहानग्यांनी सादर केली. स्वराज्य सौदामिनी ताराराणीतील कलाकारांनी छत्रपती शिवरायांना वंदन करून शिवाजी महाराजांनी आपल्यासमोर उभा केलेला आदर्श आणि शिकवण यांचे आचरण करण्याची शक्ती मिळावी,अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.

डॉ.अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स निर्मिती संस्थेने आजवर वेगववेगळ्या मालिकांच्या माध्यमातून हा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. येणाऱ्या प्रत्येक पिढीला हा इतिहास सांगण्याचे दायित्व आपल्याकडे आहेच. फक्त वेगवेगळ्या माध्यमातून तो अधिक जोरकसपणे पोहचवणे महत्त्वाचे असल्याचे या मालिकेचे निर्माते घनश्यामराव यांनी यावेळी सांगितले.

सोनी मराठी वाहिनीवरील' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कार्तिक केंढे या मालिकेचे दिग्दर्शन करीत आहेत. या मालिकेत भूमिकेत स्वरदा थिगळे असून छत्रपती राजाराम राजेंची दमदार भूमिका अभिनेता 'संग्राम समेळ' साकारली आहे. यतीन कार्येकर यांनी औरंगजेबाची भूमिका केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news