Chest Pain : छातीत दुखत आहे; घाबरु नका, हे करा घरगुती उपाय

Chest Pain : छातीत दुखत आहे; घाबरु नका, हे करा घरगुती उपाय
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अलिकडे छातीमध्ये दुखू ( Chest Pain ) लागले तर आपण घाबरुन जातो. मग आपण अतिरिक्त टेंशन घेतो आणि विनाकारण काळजी सुद्धा करतो. कधी कधी हे छातीतील दुखणे शरीरातील इतर कारणांनी सुद्धा उद्भवू शकते. जसे की, सर्दी, कफ, गॅस अशा इतर कारणांनी छातीमध्ये दुखण्याची शक्यता असते. अशावेळी घाबरुन न जाता अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरगुती उपायांनी देखील असे दुखणे दूर करु शकतो. चला तर जाणून घेऊ या छातीमधील दुखणे थांबविण्यासाठी कोणते घरगुती उपाय ( Home Remedie ) करावेत.

हळदीचे गरम दूध

गरम दूधात हळद घालून पिल्यास शरीरात अनेक ठिकाणी होणाऱ्या वेदना शमविण्यासाठी मदत होते. तसेच हळदीचे दूध पिल्याने छातीमधील दुखणे ( Chest Pain ) देखिल थांबते. या दूधामध्ये आपण मध देखिल घालू शकता. हळदमध्ये अँटी बॅक्टेरिअल तत्व असतात त्यामुळे कफमुळे छातीत निर्माण होणाऱ्या दुखण्याला फायदा मिळू शकाते. तुम्ही सकाळ संध्याकाळी असे हळदीचे दूध पिऊ शकता.

शेकणे

छातीमध्ये (Chest Congestion) ज्या भागात दुखत  ( Chest Pain ) आहे त्या भागावर सुती फडके गरम करुन शेकू शकता. हे फडके गरम पाणी अथवा गरम तव्याद्वारे गरम करु शकता. असे गरम फडक्याने ५ सेंकदापर्यंत ठेऊन शेकला तर तुम्हाला आराम मिळू शकतो.

तसेच आपण छाती जवळील जो स्नायू दुखू लागला या त्या ठिकाणी थंड बर्फाने देखिल शेकू शकता. विटामिन डी च्या कमतरतेमुळे छातीच्या खालील भागातील स्नायू दुखू शकतो. थंड बर्फाने त्या ठिकाणी शेकल्यास फायदा मिळू शकतो.

गरम पाणी पिणे

गरम पाणी पिणे हे नेहमी शरीरासाठी लाभदायक ठरते. तुम्हाला खोकला, सर्दी अथवा कफमुळे (Phlegm) छातीत दुखत ( Chest Pain ) असेल तर गरम पाण्यामुळे आराम मिळू शकतो.

बदामाचे दूध

जर अन्ननलिकेत पित्तामुळे जळजळ अथवा छातीत दुखत असेल तर बदाम घालून दूध प्यावे. यामुळे असे दुखणे थांबण्यास मदत होते.

लिंबू पाणी

जर पोटामधी गॅसमुळे छातीत दुखत असेल तर कोमट गरम पाण्यात लिंबू पिळूण पिल्यास तुम्हाला आराम मिळू शकतो.

महत्त्वाची सुचना : ( Chest Pain )

तुम्हाला सर्दी, खोकला, कफ, पित्त असे त्रास होत असताना जर छातीत दुखू लागले तर तुम्ही घरच्या घरी वरील सांगितलेले उपाय करुन पाहू शकता. पण, छातीतील दुखण्याकडे दुर्लक्ष करणे हे धोकादायक ठरते त्यामुळे अशावेळी तुमच्या फॅमिली डॉक्टर किंवा ह्रदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. असे आजार अंगावर काढण्यापेक्षा वेळीच निदान करुन त्यावर उपचार करणे आवश्यक ठरते. वरील सांगितलेल्या गोष्टी या साध्या घरगुती उपाय आहेत याने मुळापासून इलाज होईल हे सांगता येत नाही. ज्याने त्याने आपल्या व्यक्तीगत प्रकृतीनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपाय करावेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news