फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर उद्या लग्नबंधनात अडकणार | पुढारी

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर उद्या लग्नबंधनात अडकणार

पुढारी ऑनलाईन; बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर कपल उद्या लग्नबंधनात अडकणार आहेत. दोन्हीकडे लग्नाची जोरदार तयारी झाली असून सध्या फरहान आणि शिबानीच्या मेहंदी आणि हळदीचा ( shibani dandekar mehendi ) कार्यक्रम पार पडाला आहे. लग्नाच्या आधी दोघांच्या प्री-वेडिंगचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अभिनेता फरहान अख्तर गेल्या काही दिवसांपासून गायिका शिबानी दांडेकरसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. फरहान आणि शिबानी दोघेजण २१ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबईत कोर्ट मॅरेज करणार असल्याची माहिती जवळच्या सुत्राकडून मिळाली आहे. परंतु, कोर्ट मॅरेजच्या दोन दिवसआधीच फरहान आणि शिबानी हिंदू पद्धतीने १९ फेब्रुवारी २०२१ रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत. हा विवाह सोहळा खंडाळा येथील ‘सुकून’ या फार्महाऊसवर पार पडणार आहे. सध्या फरहान-शिबानीच्या घरी त्यांच्या प्री-वेडिंगला सुरुवात झाली आहे.  मेंहदी- हळदीचा ( shibani dandekar mehendi ) या कार्यक्रमाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या सोहळ्यासाठी फरहानने मुंबईतील बंगल्याला लायटींगसह फुलांची सजावट केली आहे. याच दरम्यान फरहानच्या नातेवाईक आणि जवळच्या मित्रमंडळीसह अनेक बॉलिवूड कलाकार देखील सहभागी झाले आहेत. यात बॉलिवूड अभिनेत्री शबाना आजमी, अनुषा दांडेकर, रिया चक्रवर्ती आणि अमृता अरोरा पोहोचल्या आहेत. यावेळी शिबानीसह बहिण अनुषा दांडेकर खूपच उत्साहीत दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोत शबाना आजमीने मस्टर्ड रंगाचा आउटफिट तर शिबानी दांडेकरने यैलो रंगाची फ्रिल साडी परिधान केली आहे. यासोबत शिबानीच्या सौदर्यांत मांग टिका, मोकळ्या केसांनी चार चॉद लावले आहेत.

रिया चक्रवर्ती पिवळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये तर अमृता अरोराने पिवळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये दिसली. याच दरम्यान रिया आणि अनुषाचा ‘आंखे मारे’ या गाण्यावर धमाकेदार डान्स देखील पाहायला मिळाला आहे. हा कार्यक्रम घराच्या टेरेसवर पार पडला आहे.
फरहान आणि शिबानी दोघांनी २०१८ मध्ये अफेअर असल्याचा खुलासा सोशल मीडियावर केला होता. फरहान हे दुसरे लग्न आहे. याआधी फरहानने हेअरस्टायलिस्ट अधुना भबानीशी लग्न केले होते. त्यांना दोन मुली आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर फरहान अख्तर शेवटचा ‘तुफान’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर आणि परेश रावल मुख्य भूमिकेत होता. याशिवाय फरहानचा आगामी ‘जी ले जरा’ चित्रपट येत आहे. या चित्रपटात कॅटरिना कैफ, प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा 

(video : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button