Victoria Hindi version : ‘व्हिक्टोरिया’ लवकरच हिंदी व्हर्जनमध्ये

victoria movie
victoria movie
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग, आशय कुलकर्णी अभिनित 'व्हिक्टोरिया' हा भयपट सध्या सिनेमागृहात प्रेक्षकांचे मनसोक्त मनोरंजन करताना दिसत आहे. १३ जानेवारी रोजी चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाच्या ट्रेलरचं दणक्यात स्वागत झालं होतं,तितकाच प्रेक्षकांचा प्रतिसाद थिएटरमध्येही पहायला मिळत आहे. (Victoria Hindi version ) मराठीत चित्रपटाला मिळत असलेलं यश पाहून आता निर्मात्यांनी 'व्हिक्टोरिया' साठी एक मोठा निर्णय घेतला आहे. चित्रपट मराठी प्रेक्षकांसोबतच आता हिंदी भाषिक प्रेक्षकांनाही एन्जॉय करता यावा यासाठी लवकरच त्याचे हिंदी डब व्हर्जन रिलीज करण्यात येणार आहे. (Victoria Hindi version)

व्हिक्टोरिया चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स एल. एल. पी आणि गुसबम्स एंटरटेन्मेंट यांनी केली आहे. आनंद पंडित, रुपा पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग हे या सिनेमाचे निर्माते आहेच. तसेच चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी या तरुण दिग्दर्शकांनी सांभाळली आहे.

'व्हिक्टोरिया' चित्रपट स्कॉटलंडमध्ये देखील शूट करण्यात आला आहे. त्यानिमित्तानं चित्रपटात दाखवण्यात आलेला पॅलेस अन् इतर विलोभनीय दृश्य प्रेक्षकांना मनोरंजनाची स्पेशल ट्रीटही देत आहेत. पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी यांच्या चित्रपटातील भूमिकांनाही प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे.

"व्हिक्टोरिया' लवकरच हिंदी भाषेत डब करुन रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news