Rasha Tandon : सौंदर्यात रविना टंडनलाही मागे टाकते तिची मुलगी, पाहतचं राहाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा टंडनला तुम्ही पाहतचं राहाल. राशा टंडन आपल्या आईसारखीच सुंदर आणि ग्लॅमरस आहे. राशा सुंदर फोटोग्राफी करते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला तिने काढलेले फोटो पाहायला मिळतात. (Rasha Tandon) आता असे वृत्त आले आहे की, ती आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. अभिषेक कपूरने राशाला आपल्या आगामी चित्रपटासाठी फायनल केलं आहे. या चित्रपटातून अजय देवगनचा भाचा अमन देवगनचीदेखील बॉलीवूड एन्ट्री होत आहे. (Rasha Tandon)
काही मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटामध्ये अजय देवगनदेखील दिसत आहे. अभिषेक कपूरच्या पुढील ॲक्शन ॲडव्हेंचर मुख्य भूमिकेत राशा दिसणार आहे.
अभिषेक बॉलीवूडचे दोन स्टारकिड्स म्हणजेच राशा आणि अमन देवगनला एकत्र या चित्रपटामध्ये लॉन्च करतील.
अमन देवगन मॉडलिंग करतो. अमन हा अज देवगणचा भाचा आहे.
रविना टंडनबरोबरचं सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून राशा टंडनचे फोटो व्हायरल होत आहेत. राशाने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले आहे.
राशाच्या शाळेतील समारोपावेळी रवीनाने आपल्या मुलीसाठी एक इमोशनल पोस्टदेखील लिहिली होती.
यावर्षी राशा १८ वर्षांची होईल. रवीना आणि अनिल थडानीदेखील रासाला मिळालेल्या चित्रपटाच्या ऑफरने खूप खुश आहेत. रिपोर्टनुसार, राशा आणि अमनसाठी चित्रपटाचे प्रशिक्षण ठेवण्यात येणार आहे.
अभिषेक कपूरने याआधी राजकुमार राव, सुशांतसिंह राजपूत, सारा अली खान, फरहान अख्तर यांना लॉन्च केले आहे. आता अमन आणि राशा यांची बॉलवूडमध्ये सुरुवात कशी होणार, हे पाहणे रंजक ठरेल.
- पोस्ट ऑफीस उघडं आहे : प्रजासत्ताक दिनानिमित्त सैन्यदलासाठी विशेष शुभेच्छा पत्रे
- Pathaan Movie : शाहरुखच्या ‘पठान’ला मिळाला सुट्टीचा फायदा
- Padma Awards 2023 : झाडीपट्टी रंगभूमीचे परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
View this post on Instagram
View this post on Instagram