Pathaan Movie : शाहरुखच्या 'पठान'ला मिळाला सुट्टीचा फायदा | पुढारी

Pathaan Movie : शाहरुखच्या 'पठान'ला मिळाला सुट्टीचा फायदा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण स्टारर ‘पठान’ २५ जानेवारीला रिलीज झाला होता. (Pathaan Movie) ओपनिंग डेवर ही पठानने एस एस राजामौलीचा ‘बाहुबली २’ चा रेकॉर्ड तोडला. चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ५१ कोटी रुपये कमावले. पब्लिक डिमांडवर हे शोजदेखील वाढवण्यात आले. (Pathaan Movie)

‘पठान’ची ओपनिंग डेवर ५१ कोटी रुपयांची कमाई

शाहरुख खानचा ‘पठान’ आणि आणखी त्याची ४ वर्षांनंतर पडद्यावरील वापसीने चाहत्यांना फार उत्सुकता होती. चाहत्यांची प्रतीक्षा संपली. दरम्यान, ‘पठान’मधील गाणे ‘बेशरम रंग’वरून हा चित्रपट बायकॉट करण्याची मागणी होत होती. जागी-जागी विरोध होत होते. काही संघटनांनी विरोध करत २५ जानेवारी रोजी जेव्हा ‘पठान’ रिलीज झाला, तेव्हादेखील काही ठिकाणी संघटनांनी विरोध केला आणि सिनेमागृहांमध्ये लागलेले चित्रपटाचे पोस्टर्सची तोडफोड करण्यात आली. पण, ओपनिंग डेवर ‘पठान’ने जो धुमाकूळ घातला, त्यामुळे सगळीकडे त्याचीच चर्चा होताना दिसतेय.

रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली रिलीज झालेल्या ‘पठान’ ने ओपनिंग डेवर ५१ कोटी रुपयांची रेकॉर्ड कमाई करून बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस पाडला. ‘पठान’च्या दर्शकांनाच नाही तर चित्रपट समीक्षकांकडूनही जबरदस्त रिव्ह्यू मिळत आहेत. सोशल मीडियावर अनेक असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये प्रेक्षक सिनेमागृहामध्ये शिट्ट्या वाजवत आणि नाचताना दिसत आहेत.

Back to top button