Viral Reel Controversy : बदनामीकारक रीलप्रकरणी शाहरुख खानची 'इन्फ्लुएन्सर'ला मानहानीची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

Shah Rukh Khan Viral Reel Controversy : 'अभिव्यक्ती स्वातंत्र्या'च्या अंतर्गत टीका केल्याचा 'इन्फ्लुएन्सर'चा दावा
Shah Rukh Khan Viral Reel Controversy
अभिनेता शाहरुख खानने एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. Pudhari News
Published on: 
Updated on: 

Shah Rukh Khan Viral Reel Controversy : अभिनेता शाहरुख खानने एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. संबंधित इन्फ्लुएन्सरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या 'रील'मध्ये शाहरुख खान आणि उद्योगपती अनंत अंबानी यांच्यातील संवादाबाबत दिशाभूल करणारे आणि मानहानीकारक दावे करण्यात आले होते. तसेच ही घटना आध्यात्मिक गुरू सद्गुरू यांच्यासोबतच्या एका संवादादरम्यानची असल्याचे त्यात दाखवण्यात आले होते.

व्हायरल रीलमध्ये नेमकं काय?

सुविज्ञ शर्मा याने इन्स्टाग्रामवर एक 'रील' शेअर केली आहे. व्हायरल झालेल्या या रीलमध्ये अनंत अंबानी आणि सद्गुरू यांच्यातील संवादाचे फुटेज, तसेच शाहरुख खान आणि अनंत अंबानी यांच्यातील संवादाचा स्वतंत्र क्लिपचा भाग होता. या रीलमध्ये असा दावा करण्यात आला होता की, या संवादादरम्यान शाहरुख खानला "शांत राहण्यास" सांगण्यात आले होते.

Shah Rukh Khan Viral Reel Controversy
Shah Rukh Khan Lalbagcha Raja Video: लालबागच्या दरबारात शाहरूख घामनं भिजला.. बायकोसमरोच मॅनेजर पूजाच्या ओढणीने चेहरा पुसला

शाहरुख खानच्या लिगल टीमने दावे फेटाळले

शाहरुख खानच्या लिगल (कायदेशीर) टीमने व्हायरल होत असलेल्या रीलमधील दावा फेटाळला आहे. तसेच ही रील "दुर्भावनापूर्ण, दिशाभूल करणारी आणि मानहानीकारक" असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओसोबत दिलेले कॅप्शन हे संवादाचा संदर्भ चुकीच्या पद्धतीने मांडण्यासाठी आणि अभिनेत्याची प्रतिमा व प्रतिष्ठा मलीन करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले होते.

Shah Rukh Khan Viral Reel Controversy
Shah Rukh Khan : शाहरुख खानची 'मन्नत' होणार पूर्ण; घरावर आणखी २ मजले बांधण्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

कोणालाही ठोस पुराव्याशिवाय खोटी माहिती पसरवण्याचा अधिकार नाही

नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, व्हायरल होत असलेल्या रीलमधील दावा पूर्णपणे निराधार आणि खोटा आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय अशा प्रकारची सामग्री पसरवल्यास अभिनेत्याच्या सार्वजनिक प्रतिमेचे नुकसान होऊ शकते. भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३५६ (जे मानहानीशी संबंधित आहे) चा संदर्भ देत, नोटीसमध्ये म्हटले आहे की, कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक व्यक्तींबद्दल ठोस पुराव्याशिवाय खोटी आणि नुकसानकारक विधाने पसरवण्याचा अधिकार नाही.

Shah Rukh Khan Viral Reel Controversy
Deool Band 2 & Shah rukh khan | देऊळबंद २ साठी शाहरुख खानने केली ‘लाखमोलाची’ मदत, प्रवीण तरडेंनी केली गोष्ट उघड!

४८ तासांत पाच मागण्या पूर्ण करण्याची मागणी

या नोटीसद्वारे शर्मा यांना ४८ तासांच्या आत पाच मागण्या पूर्ण करण्यास आणि केलेल्या कार्यवाहीबाबत लेखी पुष्टी देण्यास सांगण्यात आले आहे. इन्फ्लुएन्सरला ती वादग्रस्त इन्स्टाग्राम रील त्वरित हटवण्यास, हा दावा पुन्हा शेअर न करण्यास, तसेच व्हिडिओशी संबंधित कॅप्शन आणि विधाने काढून टाकण्यास किंवा दुरुस्त करण्यास सांगण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, शर्मा यांना मूळ फुटेज आणि या मजकुराच्या प्रकाशनाशी संबंधित सर्व नोंदी जतन करून ठेवण्यास आणि ४८ तासांच्या आत सर्व मागण्या पूर्ण केल्याची लेखी पुष्टी देण्यासही निर्देश देण्यात आले आहेत.

Shah Rukh Khan Viral Reel Controversy
Shah Rukh Khan : शाहरुख खानमुळे पुजाराच्या क्रिकेट करिअरला 'जीवदान'! 2009 मध्ये काय घडलं होतं?

इन्फ्लुएन्सरने दिले शाहरुख खानला प्रत्युत्तर

कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर, संबंधित कंटेंट क्रिएटर सुविज्ञ शर्मा याने शाहरुख खानला प्रत्युत्तर दिले आहे. आपण केलेली टीका ही 'अभिव्यक्ती स्वातंत्र्या'च्या अंतर्गत येते, असे त्याने म्हटले आहे. "ज्या व्यक्तीने कथितरीत्या शाहरुख खानला गप्प बसण्यास सांगितले, तिने त्याचा अपमान केला नाही का? शाहरुख खानमध्ये आपला अपमान झाला आहे हे सांगण्याचे धैर्य नाही का?" असे सवाल त्याने केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.