Shah Rukh Khan Lalbagcha Raja Video: लालबागच्या दरबारात शाहरूख घामनं भिजला.. बायकोसमरोच मॅनेजर पूजाच्या ओढणीने चेहरा पुसला

Shah Rukh Khan Lalbagcha Raja Video
Shah Rukh Khan Lalbagcha Raja Videopudhari
Published on
Updated on

Shah Rukh Khan Lalbagcha Raja viral video: मुंबईत सार्वजनिक गणेश उत्सवाची धामधूम आता शिगेला पोहचली आहे. मुंबईतील सर्वात मोठं आकर्षण लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी सामान्य नाही तर सेलिब्रेटी देखील रांगा लावतात. बॉलीवूडचा स्टार शाहरूख खान देखील आपल्या कुटुंबासह लालबागच्या दर्शनासाठी गेला होता. मात्र तिथला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पत्नी गौरीसमोरच शाहरूखनं जे काही केलं ते पाहून चाहते अवाकच झाले आहेत.

Shah Rukh Khan Lalbagcha Raja Video
Shah Rukh Khan : शाहरुख खानची 'मन्नत' होणार पूर्ण; घरावर आणखी २ मजले बांधण्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

शाहरूखने घेतला लालबागच्या राजाचा आशीर्वाद

शाहरूख खान लालबागच्या दरबारात पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना खान आणि मॅनेजर पूजा ददलानीयांच्यासोबत आला होता. त्याने बाप्पाला वाकून नमस्कार केला अन् आशीर्वाद घेतला. लालबागच्या दर्शनसाठी प्रचंड गर्दी असते. त्यात उष्णतेमुळं शाहरूख खानला चांगलाच घाम फुटला होता.

Shah Rukh Khan Lalbagcha Raja Video
Deool Band 2 & Shah rukh khan | देऊळबंद २ साठी शाहरुख खानने केली ‘लाखमोलाची’ मदत, प्रवीण तरडेंनी केली गोष्ट उघड!

शाहरूखला फुटला घाम

शाहरूखचे लालबागच्या राजाचे दर्शन घेतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यातील एक व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. घामाघुम झालेला शाहरूख त्याची मॅनेजर पूजा ददलानीच्या ओढणीने चेहरा पुसताना दिसला. यावेळी गौरी खान आणि मुलगी सुहाना खान त्याच्या शेजारीच होते. तरी देखील शाहरूखने सर्वांसमोर पूजाच्या ओढणीने आपला चेहरा पुसला.

Shah Rukh Khan Lalbagcha Raja Video
Shah Rukh Khan: शाहरुख खानसारखे देशद्रोही... IPLमध्ये बांगलादेशच्या मुस्तफिजूरला करोडो रुपये दिल्याने भाजप नेते संतप्त

पूजा घरच्या सदस्यासारखीच

पूजा ददलानी ही शाहरूखची अत्यंत विश्वासातील मॅनेजर असून ती त्यांच्या कुटुंबातील एक सदस्याप्रमाणेच आहे. त्यामुळं तिच्या ओढणीने आपला चेहरा पुसण्यात शाहरूखला काहीच वाटलं नाही. शाहरूख एवढ्या गर्दीत देखील फोटोग्राफर्सना निराश केलं नाही. त्याने हसत हसत फोटोसाठी पोज दिली.

शाहरूखने लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताना निळ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला होता. तर सुहानाने हिरव्या रंगाचा पारंपरिक ड्रेस घातला होता. गौरीने पिवळ्या रंगाचा सूट घातला होता. खान फॅमिली एथनिक लूकमध्ये होती.

Shah Rukh Khan Lalbagcha Raja Video
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खानही निघाला कोणाचातरी जबरा फॅन, त्याच्या भेटीसाठी रांगेत थांबला आणि...

शाहरूख खान मुस्लिम असला तरी तो प्रत्येक धर्म समान मानतो. तो प्रत्येक धर्माला आदराच्या भावनेनं पाहतो. त्यांच्या घरी दर वर्षी गणपती बाप्पा विराजमान होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news