Salman Khan Children: ६० वर्षाचा सलमान म्हणतो एक दिवस माझीही मुले असतील.. भावनिक आधार अन् कुटुंबाबतही भरभरून बोलला

सलमान खान नुकतेच कॉफी विथ करणच्या नवव्या हंगामात दिसणार आहे. सलमान खानच या शो चे ओपनिंग करणार आहे.
Salman Khan Children
Salman Khan Childrenpudhari
Published on: 
Updated on: 

Salman Khan Children: बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. त्याने आपल्या फिटनेसवरून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. तसेच सीजेपीच्या आंदोलनादरम्यान देखील त्याच्या एक ट्विट आता ट्रेंड झाला आहे. सलमान खान नुकतेच कॉफी विथ करणच्या नवव्या हंगामात दिसणार आहे. सलमान खानच या शो चे ओपनिंग करणार आहे. करणच्या म्हणण्यानुसार हा कॉफी विथ करणचा शेवटचा हंगाम आहे.

Salman Khan Children
Salman Khan: ‘एक-दोन जणांना तुरुंगात टाका, मगच हा प्रकार थांबेल’, असं काय घडलं की सलमान खान संतापला

सलमानला हवं आहे मुल

सलमान खानला यावेळी करणने अनेक वैयक्तिक प्रश्न विचारले. काही प्रश्न असं होते की जे वर्षानुवर्षे सलमान खानला विचारण्यात येत होते. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे तू लग्न करणार का? तुला मुल बाळ काही हवं आहे की नाही?

करण जोहरच्या शोचा प्रीमियर रिलीज झाला आहे. त्याच्या पहिल्या एपिसोडचा प्रोमी रिलीज झाला आहे. त्यात सलमान खान गेस्ट असून सलमान खानला मुला बाळांची कमतरता जाणवते का असा प्रश्न करण जोहर विचारतो. त्यावेळी सलमान खानने होकारार्थी उत्तर दिलं आहे. त्याने एक दिवस आपलीही मुले असतील असा आशावाद बोलून दाखवतो. या संभाषणावेळी सलमान खानने कुटुंबाच्या भावनिक आधाराबाबत आणि एकत्र राहणे का महत्वाचे आहे याच्यावर देखील भाष्य केलं.

Salman Khan Children
Salman Khan | सलमानने रागाच्या भरात काढला शर्ट, बॉडी शेमिंग करणाऱ्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर!

सलमान अजून सिंगल

सलमान खान हा रोमानियाची गायिका आणि अभिनेत्री लुलिया वंतूरला बऱ्याच काळापासून डेट करत आहे. २०१५ मध्ये दोघांना मुंबई एकत्र पाहण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्या रिलेशनशिपची अफवा सुरू आहे.

Salman Khan Children
Salman Khan: 'बिग बॉस'चा प्रोमो पाहून आरोग्याबाबत प्रश्न, चाहते झाले चिंतित; अखेर सलमानने सांगितली खरी माहिती

लग्न होता होता राहिलं

सलमान खान पहिल्यापासून सिंगल राहू इच्छितो असं नाही. त्याची अनेक रिलेशनशिप्स गाजली आहेत. एक काळ असा होती की सलमानच्या लग्नाची पत्रिका छापली गेली होती. मात्र मधेच माशी शिंकली अन् त्याचं लग्न होऊ शकलं नाही.

सलमान खानचे संगिता बिजलानी, ऐश्वर्या राय आणि कॅटरिना कैफ सोबत अफेअर सुरू होते. मात्र त्याची ही अफेअर्स लग्नाच्या मांडवापर्यंत काही पोहचली नाहीत. याबाबत सलमान स्वतःला कारणीभूत मानतो. असं वक्तव्य त्याने जाहीर कार्यक्रमात केलं देखील आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news