Salman Khan: ‘एक-दोन जणांना तुरुंगात टाका, मगच हा प्रकार थांबेल’, असं काय घडलं की सलमान खान संतापला

Salman Khan AI Deepfake: सलमान खानने ‘बिग बॉस 20’च्या ‘वीकेंड का वार’मध्ये AIच्या मदतीने तयार होणाऱ्या बनावट व्हिडिओंवर संताप व्यक्त केला.
Salman Khan AI Deepfake
Salman Khan AI DeepfakePudhari
Published on: 
Updated on: 

Salman Khan AI Deepfake: ‘बिग बॉस 20’च्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सोशल मीडियावरील बनावट आणि AI तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेल्या व्हिडिओंच्या वाढत्या प्रकारावर सलमान खानने तीव्र नाराजी व्यक्त केली. या वेळी त्यांनी डिजिटल सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत अशा प्रकारच्या कंटेंटवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

सलमान खान यांनी सांगितले की, AI तंत्रज्ञानाच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा आवाज हुबेहुब तयार केला जाऊ शकतो. त्यानंतर त्या आवाजाचा वापर करून चुकीची किंवा आक्षेपार्ह वक्तव्ये असलेले व्हिडिओ तयार केले जात आहेत. अशा बनावट व्हिडिओंमध्ये स्वतःचाही समावेश असल्याचे त्याने सांगितले.

तो म्हणाला, “कोणी तुमच्या AI व्हॉइस क्लोनचा वापर करून एखाद्याला शिवीगाळ करत असेल, तर हे अत्यंत गंभीर आहे. अनेक लोकांचे AI व्हिडिओ तयार केले जात आहेत आणि त्यात माझेही बनावट व्हिडिओ आहेत.”

Salman Khan AI Deepfake
Who Is Tanya Mishra: गिरिजा ओकनंतर आता देशात 'हिची' चर्चा... भारताची नवी 'नॅशनल क्रश' तानिया मिश्रा आहे तरी कोण?

बनावट व्हिडिओ खरा समजून सामान्य लोकांकडून तो पुढे शेअर केला जाऊ शकतो, अशी चिंता सलमानने व्यक्त केली. मात्र, हा व्हिडिओ AIच्या मदतीने तयार करण्यात आला आहे हे माहीत असूनही जाणूनबुजून असे व्हिडिओ तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

“ज्यांना हा कंटेंट बनावट आहे हे माहीत आहे आणि तरीही ते असे व्हिडिओ तयार करतात, अशा लोकांना तुरुंगात टाकले पाहिजे. एक-दोन जणांना तुरुंगात टाकल्याशिवाय हा प्रकार थांबणार नाही,” असे सलमान खानने म्हटले आहे.

Salman Khan AI Deepfake
Gold Silver Price Today: सोनं तब्बल ३,१६० रुपयांनी स्वस्त! चांदीही १० हजारांनी घसरली; खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी, आजचा भाव काय?

यासोबतच सोशल मीडियावर अशा प्रकारच्या बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या कंटेंटवर कडक नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचेही त्याने सांगितले. AI तंत्रज्ञानाचा गैरवापर वाढत असताना सेलिब्रिटींसोबतच सामान्य नागरिकांचे फोटो, आवाज आणि व्हिडिओही परवानगीशिवाय वापरले जाण्याचा धोका वाढला आहे.

‘बिग बॉस 20’च्या या एपिसोडमध्ये सलमान खानने AI बनावट व्हिडिओंच्या मुद्द्यासोबतच पापाराझींच्या वर्तनाबाबतही भाष्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news