

Salman Khan Shirtless बहुचर्चित रिअॅलिटी शो 'बिग बॉस २०'चा 'वीकेंड का वार' चांगलाच गाजला. या शोमध्ये काल सलमानने आपला शर्ट काढून अनेक ट्रोलर्सना चांगलेच उत्तर दिले आहे. गेले काही दिवस सलमानच्या वजनावरुन तसेच उतरलेल्या चेहऱ्यावरुन बऱ्याच चर्चा रंगल्याह होत्या. तसेच कटरीना कैफ .ही अंबानींच्या गणपतीमध्ये दिसली होती तीचेही वजन वाढले हाते. तसेच साहेल खानही अशक्त दिसला होता यावरुन अनेकांनी त्यांना ट्रोल केले होते. आज सलमानने आज शो दरम्यान आपला शर्ट काढत आपली तब्येत दाखवत ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला.
होय माझे वय झालेय पण ही बघा बॉडी, तुमच्या आई वडीलांच्या तब्येतीकडे पहा असे उत्तर देत, ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटींना होणाऱ्या 'बॉडी शेमिंग' आणि अकारण ट्रोलिंगच्या मुद्द्यावरून सलमानने ट्रोलर्सचा खरपूस समाचार घेतला.
'होय, मी ६० वर्षांचा झालोय'
वाढत्या वयावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर थेट बोलताना सलमान म्हणाला, लोकांना ट्रोल करण्यात फार आनंद मिळतो. माझ्यावरही टीका झाली की, 'अरे हा तर म्हातारा झालाय'. होय, मी ६० वर्षांचा झालो आहे. आयुष्यभर कोणी 'मैने प्यार किया'च्या वयाचा राहू शकत नाही. लोक सतत म्हणतात की म्हातारा झालाय, हे झालंय, ते झालंय... पण लोकांना इतरांना ट्रोल करायची ही विकृती का असते?
ट्रोलर्सचा समाचार घेताना त्याने पुढे म्हटले की, ट्रोलर्स अनेकदा कलाकारांचे शरीर, वजन, लूक, करिअर आणि मातृत्वानंतर बदलणाऱ्या रूपावर अत्यंत हीन पातळीवर जाऊन कमेंट्स करतात. अशा घाणेरड्या भाषेचा वापर करून ट्रोलर्स केवळ स्वतःचे संस्कार दाखवून देतात. दुसऱ्यांची खिल्ली उडवण्याआधी स्वतःचा चेहरा आणि स्वतःचे कुटुंब आरशात बघा.’
हेअर ट्रान्सप्लांटच्या बातम्या केवळ अफवा
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सलमानच्या हेअर ट्रान्सप्लांटबाबत जोरदार चर्चा सुरू होती. या चर्चांना पूर्णविराम देत सलमान म्हणाला, "माझा हा नवा लूक कोणत्याही हेअर सर्जरीमुळे नसून, आगामी सिनेमाच्या कथेची ती गरज आहे. तसेच, दोन महिन्यांपूर्वी माझ्या एका अत्यंत जवळच्या मित्राचे निधन झाले होते, त्यामुळेही मी हा लूक केला होता." असेही त्याने स्पष्ट केले.