Salman Khan: सलमान गुंड आहे, त्याला अभिनयात अजिबात रस नाही; दबंगच्या दिग्दर्शकाचा खळबळजनक आरोप

अभिनव यांनी बॉलीवुडच्या भाईजानला 'गुंड आणि उद्धट माणूस' असे संबोधले
Entertainement News
Salman Khanpudhari
Published on
Updated on

दबंगचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. अभिनव यांनी बॉलीवुडच्या भाईजानला 'गुंड आणि उद्धट माणूस' असे संबोधले आहे. या दोघांनी 2010 चा सुपरहिट सिनेमा दबंगमध्ये एकत्र काम केले होते. (Latest Entertainment News)

एका मुलाखतीमध्ये त्यांनी हा खुलासा केला आहे. यामध्ये त्यांनी सलमानवर अयोग्य वर्तणूकीचे आरोप केला आहे. दबंग 5 रिलीज होण्यापूर्वी त्यांचे हे विधान समोर आले आहे. ते म्हणतात, ‘सलमान कोणते काम गांभीर्याने करत नाही. त्याला अभिनयात अजिबात रस नाही. गेली 25 वर्षे नव्हता. तो कामावर येऊन उपकार केल्यासारखा वागतो. तो एक गुंड आहे. दबंगपूर्वी मला हे माहिती नव्हते. सलमान उद्धट आहे. एखाद्या गुंडाप्रमाणेच वागतो आहे.

Entertainement News
Tarak Mehta ka ooltah Chashma: आता बास! आम्ही नवीन दयाबेनच्या शोधात आहोत; असित मोदींनी केला खुलासा

सलमानला बॉलीवूडमधील स्टार सिस्टिमचे जनक असल्याचे सांगत अभिनव कश्यप म्हणतो, तो अशा कुटुंबातून आला आहे जे गेली 50 वर्षे सिनेसृष्टीत आहे. हे वारशाने चालत आले आहे. जर तुम्ही त्यांना विरोध केला तर ते तुमच्या हात धुवून पाठी लागतात.’

अभिनव पुढे म्हणतात, ‘ माझा भाऊ अनुराग कश्यप याने सलमानसोबत काम करण्याचा वाईट अनुभव माझ्याशी शेअर केला होता. ते म्हणतात, ‘तू सलमानसोबत काम करू शकणार नाहीत. त्याने त्यावेळी मला हे सगळे खूप विस्तारपूर्वक सांगितले नाही. पण त्यांना या सगळ्यांच्या वाईट वागण्याची कल्पना आली होती. शेवटी त्याने 'तेरे नाम' सिनेमा सोडला.

त्याने तेरे नामची पटकथा लिहिली होती. बोनी कपूर यांनी त्याला वाईट वागणूक दिली. त्याचे श्रेयही त्याला दिले नाही.

Entertainement News
Celebrity Divorce: राहुल देशपांडेनंतर हा संगीतकारही पत्नीपासून झाला विभक्त; पत्नीही आहे उत्तम अभिनेत्री

माझ्यासोबतही असेच झाले आहे. कोणत्याही चांगल्या सिनेमाचा आधार पटकथा असतो. पण मलाही मिळावे तसे क्रेडिट मिळाले नाही.’

यापूर्वीही अभिनव कश्यपने अनेकदा सलमानविरोधात मतप्रदर्शन केले आहे. तसेच सलमानचे वडील यांच्यावर त्याने करियर उद्ध्वस्त केल्याचा आरोपही केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news