

लोकप्रिय मालिका तारक मेहता का उलटा चश्माने नुकतेच 17 वर्षे पूर्ण केली आहेत. 17 वर्षांनंतरही ही मालिका टीआरपीमध्ये आपले स्थान कायम ठेवून आहे. ही मालिका सुरू झाल्यापासून त्यात अनेक बदल झाले. दरवेळी कथानकात एक नवीन ट्विस्ट निर्माण करण्यात आणि रंजकता वाढवण्यात निर्माते यशस्वी ठरले आहेत. अनेक जुन्या कलाकारांच्या जागी नवे चेहरे दिसत आहेत. (Latest Entertainment News)
यामध्ये प्रेक्षकांच्या कोणत्या पात्राची सर्वात जास्त आठवण येत असेल तर ती दयाबेनची. जवळपास 3 वर्षाहून अधिक काळ दयाबेनच्या व्यक्तिरेखेत दिसलेली दिशा वाकानी मालिकेपासून लांब आहे. त्यांतर अनेकदा निर्मात्यानी तिला मालिकेत परत येण्याची विनंती केली. पण दरवेळी काही न काही कारण होऊन दिशाचे येणे लांबत गेले. अलीकडेच एका मुलाखतीमध्ये असित मोदीनी खुलासा केला की दिशा परत येणार नाही याचा अंदाज आल्यावर त्यांना भीती वाटली होती.
याचे कारण सांगताना ते म्हणतात, 2017 मध्ये तिने शो सोडला तेव्हा मी खूप घाबरलो होतो. जेठालाल इतकेच दया हेदेखील मालिकेतील महत्त्वाचे पात्र आहे. दिशाने या व्यक्तिरेखेत स्वत:चे खास रंग भरले होते. त्यामुळे ही व्यक्तिरेखा देशभर लोकप्रिय झाली होती. त्यामुळे ती गेल्यानंतरही बराच काळ मी कुणाला तिच्याजागी घेण्याचा विचार केला नाही. पण आता पुरे. आता पाणी डोक्यावरून गेले आहे. आता शोमध्ये नवीन दया आणण्याची वेळ आली आहे.’
पुढे ते म्हणतात, ‘ दिशा आणि माझ्यात खूप चांगले बॉंडिंग आहे. आमच्यात कोणताही वाद नाही. मी पुनः तिच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. पण तिच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे हे शक्य झाले नाही.
अलीकडेच रक्षाबंधन दरम्यान असित मोदी आणि त्यांची पत्नी यांनी दिशाच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी दिशाने असित यांना राखी बांधली होती. यानंतर दिशा परत मालिकेत दिसणार अशी अशा वाटत असतानाच असित यांच्या विधानाने यावर पडदा टाकला आहे.