

गायक राहुल देशपांडे यांनी नुकतीच पत्नी नेहापासून विभक्त झाल्याची पोस्ट सोशल मिडियावर शेयर केली. त्यांच्या या पोस्टने अनेकांना धक्का बसला आहे. पण यानंतर आणखी एका संगीतकाराने पत्नीपासून विभक्त होत असल्याची पोस्ट शेयर केली आहे. संगीतकार आनंद ओक आणि अभिनेत्री शुभांगी सदावर्ते या दोघांनी आता घटस्फोट घेतला आहे. शुभांगी सदावर्ते सध्या संगीत देवबाभळी या नाटकात आवलीची व्यक्तिरेखा साकारते आहे. आनंद ओकने सोशल मीडिया पोस्ट करत ही माहिती दिली आहे. (Latest Entertainment News)
या पोस्टमध्ये आनंद म्हणतो, ‘शुभांगी आणि मी गेल्यावर्षीच वेगळे झालो आहोत. या निर्णयाशी जुळवून घेण्यासाठी मी पुरेसा वेळ घेतला. आता हे शेयर करण्यासाठी योग्य वेळ आहे असे मला वाटत आहे. मी एकत्र घालवलेल्या वेळेसाठी कायमच कृतज्ञ आहे. मी तिला भविष्यासाठी शुभेच्छा देतो. ती खूप चांगली अभिनेत्री आणि व्यक्ति आहे. आम्ही एकत्र काम करत राहूच.’
शुभांगी आणि आनंदने 2020 मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र लग्नाच्या पाच वर्षातच या जोडीने घटस्फोट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आनंद ओक संगीत देवबाभळी या अत्यंत लोकप्रिय नाटकाला संगीत दिले आहे. याच नाटकात शुभांगी तुकारामांच्या पत्नीची, आवलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. तिच्या या भूमिकेसाठी तिच्यावर प्रत्येक प्रयोगानंतर कौतुकाचा वर्षावही होतो आहे. शुभांगीने याशिवाय 'लक्ष्य', 'नवे लक्ष्य' या मालिकांमध्ये तर महाराष्ट्र शाहीर या सिनेमातही काम केले आहे.