

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) नेहमीच आपल्या आयुष्यात येणारे चढ-उतार, संकटं आणि आव्हानांबद्दल स्पष्ट बोलत असते. आतादेखील तिने तिच्यासोबत घडलेली एक मोठी घटना सर्वांसमोर आणलीय. हे कदाचित वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की, सिनेइंडस्ट्रीत अशा गोष्टी आताही घडत आहेत. यामध्ये सामान्य कलाकाराचं नव्हे तर काही दिग्गज कलाकारांनाही तोंड द्यावे लागते आहे. राधिकाने (Radhika Apte) नुकताच तिच्यासोबत घडलेली घटना सार्वजनिक केलीय. संपूर्ण प्रकरण काय आहे पाहा…
राधिका एक टॅलेंटेड अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर हॉलिवूडपर्यंत मजल मारलीय. पार्च्ड हा तिचा सिनेमा चांगलाचं गाजला. पार्च्डमध्ये तिने न्यूड सीन दिल्यामुळे यावर चर्चादेखील रंगली होती. तिच्या करिअरला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. तिने इतक्या वर्षात अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. पण, तुम्हाला माहितीये का, एका वेगळ्याचं गोष्टीमुळे तिला एक चित्रपट गमवावा लागलाय. ही संधी का हुकली याविषयी तिने सार्वजनिकपणे सांगितलं आहे.
एका चित्रपटासाठी ती प्रयत्न करत असताना तिचे ब्रेस्ट आणि ओठ अन्य अभिनेत्रींसारखे मोठे नाहीत म्हणून तिला भूमिका नाकारण्यात आल्याचं तिनं सांगितलं. एका मुलाखतीत तिने हा धक्कादायक खुलासा केला. चित्रपटाच्या प्रोजेक्टसाठी अभिनेत्रींचे मोठे ब्रेस्ट पाहून भूमिका दिल्या जातात का, अशी विचारणादेखील तिने यावेळी केलीय.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, पार्च्डची ही अभिनेत्री म्हणाली, तिला नुकताच या गोष्टीसाठी चित्रपट मिळाला नाही की, तिचे ब्रेस्ट आणि ओठ मोठे नाहीत.
तिने असेही सांगितले की, तिने जेव्हा इंडस्ट्रीत पाऊल ठेवले, तेव्हा तिला नाक बदलण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्याशिवाय बूब्स आणि पायावरदेखील ट्रीटमेंट घेण्यासाठी सांगण्यात आले होते. ही राधिकावरचं वेळ आली होता, असे नाही. याआधीही अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले आहे.
राधिका आगामी सायकॉलिजक थ्रीलर चित्रपट फॉरेन्सिकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत छपाक फेम अभिनेता विक्रांत मेस्सी दिसणार आहे. यामध्ये ती एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल. एका तरुण मुलीच्या हत्येनंतरचं रहस्य उलगडण्यासाठी राधिका ही केस सांभाळताना दिसणार आहे. त्याचबरोबर ती तमिळ चित्रपट विक्रम वेधाच्या हिंदी रिमेकमध्येही दिसेल. यामध्ये सैफ अली खान आणि ऋतिक रोशन यांच्या मुख्य भूमिका आहेत.
हेदेखील वाचा-