अरे बापरे…! चक्क पोलिस चौकीवर दगडफेक करीत केला वार ! | पुढारी

अरे बापरे...! चक्क पोलिस चौकीवर दगडफेक करीत केला वार !

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून सात आठ जणांच्या टोळक्याने तिघांचा पाठलाग केला. त्यावेळी जीव वाचवण्यासाठी त्यांनी पोलिस चौकी गाठली. मात्र, टोळक्याने थेट चौकीवर दगडफेक करीत एकावर वार केला. ही धक्कादायक घटना मध्यरात्री काळेवाडी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेजण दुचाकीवर जात होते. त्यावेळी दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्यांना शिवीगाळ करीत थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी दुचाकी थांबवली नाही. त्यामुळे टोळक्याने त्यांचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, जिवाच्या भीतीने तिघांनी थेट काळेवाडी पोलिस चौकी गाठली. मात्र, पाठीमागून आलेल्या टोळक्याने पोलिस चौकीवरच दगडफेक करीत एकावर वार केला.

दगडफेकीमुळे पोलिस चौकीतील साहित्याची नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक दहशतीखाली आले असून टवाळखोरांचे धाडस वाढल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Back to top button