Por Beautiful : आयुषी टिळकचा पहिला म्युझिक व्हिडिओ “पोर ब्युटिफुल”

Por Beautiful music Video
Por Beautiful music Video

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सुयश टिळकची पत्नी आयुषी टिळक पहिल्यांदाच "पोर ब्युटिफुल" (Por Beautiful ) या म्युझिक व्हिडिओमधून आपल्या भेटीस आली आहे. दादला बुलेटवाला या गाण्याला यश मिळाल्यानंतर सिग्नेचर ट्युन्सनं हा म्युझिक व्हिडिओ आणलाय. यामध्ये स्टीफन ब्लाझेंको हा रशियन अभिनेताही पहिल्यांदाच मराठी म्युझिक व्हिडिओमध्ये चमकत आहे. एबी एंटरटेन्मेंटच्या सहकार्यानं या व्हिडिओची निर्मिती झालीय. (Por Beautiful )

"पोर ब्युटिफुल" हा म्युझिक व्हिडिओ युट्यूबद्वारे लाँच करण्यात येणार आहे. श्रेयश राज आंगणे यांनी या म्युझिक व्हिडिओचं गीत लेखन, गायन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे, तर अमित बाईंग यांनी नृत्य दिग्दर्शन आणि म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन केलं आहे.

"तुला बघून म्हणतोय आईना, पोर ब्युटिफुल हाय ना…" असे हलकेफुलके शब्द आणि उडती चाल यामुळे हे गाणं नक्कीच संगीतप्रेमींना आवडेल. या गाण्याचं छायांकन हरेश सावंत यांनी सांभाळले असून अन्य तांत्रिक बाजूही उत्तम असल्यानं गाणं प्रेक्षणीय झालं आहे. वसईच्या निसर्गरम्य परिसरात या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.

स्टीफन ब्लाझेंको हा रशियन अभिनेता पहिल्यांदाच मराठी म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. आतापर्यंत अनेक परदेशी कलाकार म्युझिक व्हिडिओमध्ये दिसले असले, तरी रशियन अभिनेता पहिल्यांदाच मराठी म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. त्यामुळे ही देखणी "पोर ब्युटिफुल" प्रेक्षकांची पसंती मिळवणारी ठरेल यात शंका नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news