Amitabh Bachchan Property Dispute: अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा'वरून वाद; जया बच्चन यांना मालिका हस्तांतरित करण्यावर आक्षेप

Amitabh Bachchan Property Dispute: अमिताभ बच्चन यांची भावजय रामोला बच्चन यांनी दशकापूर्वी केलेल्या गिफ्ट डीडवर आक्षेप घेतला आहे.
Amitabh Bachchan Property Dispute
Amitabh Bachchan Property Disputepudhari
Published on: 
Updated on: 

Amitabh Bachchan Property Dispute: हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जुहूमधील प्रसिद्ध जलसा बंगल्याच्या मालकीवरून वाद निर्माण झाला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार अमिताभ बच्चन यांच्या भावजय रामोला बच्चन यांनी दशकापूर्वी केलेल्या गिफ्ट डीडवर आक्षेप घेतला आहे. या गिफ्ट डीडनुसार या बंगल्याची मालकी जया बच्चन यांना देण्यात आली होती.

इंडिया डुटेने दिलेल्या वृत्तानुसार रामोला यांनी हे मालकी हस्तांतरण त्यांच्या माहितीशिवाय आणि परवानगीशिवाय झाल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण मुंबईतील अंधेरीच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या डेप्युटी रजिस्टार यांच्याकडे गेले आहे. तिथं या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

Amitabh Bachchan Property Dispute
Bomb Threat Email : मुंबईला पुन्हा बॉम्बस्फोटांनी हादरवण्याची धमकी! ई-मेलमध्ये अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासह महापौर कार्यालयाचा उल्लेख

नाव बदलण्याचा प्रयत्न झाला?

अमिताभ बच्चन यांचे लहान बंधू अजिताभ बच्चन यांची पत्नी रामोला यांनी गेल्या काही महिन्यांपासून अनेक तक्रारी अंधेरीच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या डेप्युटी रजिस्टार यांच्याकडे केल्या आहेत.

या वादात मालकी हक्काच्या बाबतीत असलेली तफावत हा महत्वाचा मुद्दा आहे. कपोल हाऊसिंग सोसायटीच्या रेकॉर्डनुसार जया बच्चन या जलसा बंगल्याच्या मालकीण आहेत असं दिसतं तर महाराष्ट्र सरकार प्रॉपर्टी कार्डवर रामोला यांचे नाव आहे. ज्यावेळी रामोला यांचे नाव हटवून तिथं जया बच्चन यांचे नाव लावण्याच्या प्रयत्नानंतर हा वाद चव्हाट्यावर आला.

Amitabh Bachchan Property Dispute
Jaya Bachchan: "जया बच्चन स्वतः १५० रुपयांची साडी नेसतात आणि..."; हिंदुस्थानी भाऊ भडकला

मूळ मालकी कोणाच्या नावावर?

रामोला यांनी जलसा हा बंगला मूळ त्यांच्या नावावर रजिस्टर करण्यात आला होता. त्यानंतर जया बच्चन यांना १९९३ मध्ये गिफ्ट डीड करून ही मालकी हस्तातंरित करण्यात आली. रामोला यांनी ज्या प्रकारे कागदपत्र तयार केली त्याच्यावर आक्षेप घेतला आहे. एका साध्या कागदावर स्टँम्प ड्युटी न भरता आणि साक्षीदारांच्या हस्ताक्षरांशिवाय हे डीड करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Amitabh Bachchan Property Dispute
Amitabh Bachchan Sunday Darshan | अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बाहेर चाहत्याची प्रकृती बिघडली; 'संडे दर्शन' दरम्यान गोंधळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.