एमपीएससी-यूपीएससी स्पर्धा परीक्षांवर भाष्य करणारा ‘मुसंडी’

musandi movie
musandi movie
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : समृद्ध आशय आणि विषय घेऊन मराठीत अनेक चित्रपटांची निर्मिती होऊ लागली आहे. स्पर्धा परीक्षांचा ताण आणि त्यातील आव्हाने हा सध्या अत्यंत कळीचा मुद्दा ठरू पाहतोय. प्रामाणिक कष्टानंतरही अपयश जेव्हा समोर उभे राहते तेव्हा निराशा बळावलेली असते. अशावेळी मनोधैर्य उंचावण्याची आणि अमूल्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. हा विषय केंद्रस्थानी ठेऊन दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी 'मुसंडी' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

एमपीएससी आणि यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याचा अमुक एक 'पॅटर्न' नसतो. तीव्र इच्छाशक्ती, ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी अथक मेहनत करण्याची तयारी, मिळालेल्या अपयशामुळे खचून न जाता पुन्हा जिद्दीने उभं राहून कष्ट करण्याची तयारी हे सगळे गुण असतील तर यशाची 'मुसंडी' मारता येऊ शकते हे दाखवणारा सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत आणि गोवर्धन दोलताडे लिखित व निर्मित 'मुसंडी' हा चित्रपट ५ मे २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रोहन पाटील आणि गायत्री जाधव ही जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून या दोघांसोबत सुरेश विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, तान्हाजी गळगुंडे, शिवाजी दोलताडे, सुरज चव्हाण, अरबाज शेख, प्रणव रावराणे, अक्षय टाक, घनश्याम दरवडे, सनमीता धापटे, वैष्णवी शिंदे, माणिक काळे, सुजीत मगर, मयुर झिंजे, ऋतुजा वावरे, विकास वरे, राधाकृष्ण कराळे यांच्या भूमिका आहेत.

'मुसंडी' चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी बोलताना लेखक निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले की, राज्यासह देशातील IAS, IPS आणि यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन घेऊन या चित्रपटाचे कथा रचना करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षांमधील अपयश व त्यातील आव्हाने याचा सामना कसा करावा? हे अनेकांना उमजत नाही. अशांसाठी हा चित्रपट यशाची गुरुकिल्ली ठरेल, असं मत एमपीएससी बोर्ड महाराष्ट्र राज्याचे चेअरमन किशोरराजे निंबाळकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले. आजच्या युवकांना दिशा देण्याचं काम 'मुसंडी' चित्रपट करेल असा विश्वास निर्माता व दिग्दर्शकांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी राम शिंदे (आमदार, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य), किशोर राजे निंबाळकर(MPSC बोर्ड चेअरमन, महाराष्ट्र राज्य), सुरज मांढरे (शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य), पांडुरंग वाठारकर (माजी कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य) आनंद माळी (वसंतराव नाईक महामंडळ, व्यवस्थापकीय संचालक), मेघराजराजे भोसले (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ) यांच्यासोबत रोहन पाटील, गायत्री जाधव, सुरज चव्हाण, घनश्याम दरवडे, शिवाजी दोलताडे, माणिक काळे ही कलाकार मंडळी उपस्थित होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news