Shubhvivah : शुभविवाह मालिकेत अभिनेता यशोमन आपटेचा नवा अंदाज

shubhvivah malika
shubhvivah malika
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुप्रसिद्ध अभिनेता यशोमन आपटेला याआधी आपण रोमँटिक हिरोच्या रुपात पाहिलं आहे. मात्र आजवर त्याने साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आणि आव्हानात्मक पात्र तो स्टार प्रवाहची नवी मालिका शुभविवाहमध्ये साकारणार आहे. (Shubhvivah) १६ जानेवारीपासून दुपारी दोन वाजता सुरु होणाऱ्या या नव्या मालिकेत यशोमन मानसिक स्थैर्य गमावलेल्या आकाशची भूमिका साकारणार आहे. (Shubhvivah)

या आव्हानात्मक भूमिकेविषयी सांगताना यशोमन म्हणाला, 'आतापर्यंत मालिकेत मी रोमँटिक हिरो साकारला आहे. मात्र शुभविवाह मालिकेतील ही भूमिका खऱ्या अर्थाने इमेज ब्रेक करणारी ठरेल. ही भूमिका म्हणजे माझ्यासाठी वर्कशॉप आहे. आकाशने मानसिक स्थैर्य गमावलं आहे. त्यामुळे वयाने मोठा असला तरी तो लहान मुलासारखा वागतो. आकाशच्या अश्या वागण्यामागे एक कारण दडलेलं आहे. हे कारण नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना मालिका पहावी लागेल.

आकाश साकारताना नवनव्या गोष्टी आत्मसात करत आहे. म्हंटलं तर ही भूमिका साकारण्यासाठी बंधन आहेत आणि म्हण्टलं तर नाही. आकाश कोणत्या गोष्टीवर कशा पद्धतीने व्यक्त होईल हे समजून घेऊन सीन करावा लागतोय. प्रत्येक सीननंतर या पात्रावरची पकड घट्ट होतेय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news