Harvey Weinstein : बलात्कारप्रकरणी निर्माता हार्वे विंस्टीन दोषी | पुढारी

Harvey Weinstein : बलात्कारप्रकरणी निर्माता हार्वे विंस्टीन दोषी

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलीवूड ते बॉलीवूडपर्यंत अभिनेत्री सिनेमा जगतातील काळं सत्य जगासमोर आणत आहेत. (Harvey Weinstein) आपल्यासोबत झालेल्या कास्टिंग काउचच्या घटनांचा उल्लेख करत अमेक बड्या अभिनेत्यांचे आणि निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. आता अशी एक घटना हॉलीवूडमधून समोर आलीय. अमेरिकन चित्रपट निर्माता हार्वे विंस्टीनवर बलात्काराचा आरोप सिद्ध झाला आहे.

लॉस एंजेलिसच्या सुपीरियर कोर्टानुसार, जवळपास दोन आठवडे विचार-विनिमय केल्यानंतर ८ पुरुष आणि ४ महिलांच्या ज्युरीने ७० वर्षीय विंस्टीनविरोधात हा निर्णय दिलाय. (Harvey Weinstein)

हॉलीवूड निर्माता हारर्वे विंस्टीन बलात्कार प्रकरणी एका घटनेत आधीच तुरुंगात २३ वर्षांची शिक्षा भोगत आहे. आता त्याच्या अडचणीत आणखी वाढ झालीय. आणखी एका प्रकरणात हार्वे विंस्टीनला अन्य दोन लैंगिक शोषण प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. आधीच मीटू मोहिमेंतर्गत ८० हून अधिक महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप हार्वेवर लावण्यात आला आहे. यामध्ये हॉलीवूड अभिनेत्री जेसिका मान शिवाय विंस्टीनची माजी सहकलाकार मिमी हेलीचादेखील समावेश होता.

२०१७ मध्ये झाला होता खुलासा

विंस्टीनविषयी पहिल्यांदा २०१७ मध्ये खुलासा झाला होता. जेव्हा वृत्तपत्रातून या निर्मात्याच्या लैंगिक शोषण आणि दुष्कृत्यांविषयी सांगण्यात आले. तेव्हा मे २०१८ मध्ये हार्वी विंस्टीनला अटक करण्यात आली होती.

Back to top button