पैठण: पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील मतमोजणीस मंगळवारी (दि.२०) रोजी सकाळी आठ वाजता तहसीलदार शंकर लाड यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू करण्यात आली. पहिल्या फेरीमध्ये पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे सरपंचपदाचे दोन उमेदवार विजयी झाले तर राष्ट्रवादीचे एक उमेदवार विजय झाला आहे.
तहसील कार्यालयाच्या सभागृहात दहा टेबलवर मतमोजणी सुरू करण्यात आली. पहिल्या फेरीमध्ये सरपंचपदासाठी जांभळी येथील संदिपान भुमरे गटाचे शारद कळसकर व हिरापूरचे शारदा विनोद राठोड हे विजयी झाले आहे. तर बोकुड जळगावमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिराबाई तरमळे यांचा विजय झाला आहे. दुसऱ्या फेरीतील गेवराई बाशी, आडुळ, वरवंडी येथील मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. मतमोजणीचा निकालाची उत्सुकता सर्वांना लागल्याने परिसरात उमेदवार व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली आहे.
हेही वाचलंत का?