Gram Panchayat Election Results 2022 : बीड, केज तालुक्यात पाच फेऱ्यात मतमोजणी, पोस्टल मतमोजणी सुरू

Gram Panchayat Election Results 2022 : बीड, केज तालुक्यात पाच फेऱ्यात मतमोजणी, पोस्टल मतमोजणी सुरू

गौतम बचुटे/केज पुढारी वृत्तसेवा : Gram Panchayat Election Results 2022 : केज तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीच्या एकूण पाच फेऱ्यात मतमोजणी होत आहे. पहिल्या फेरीत 14 ग्रामपंचायतीची मतमोजणी सुरू झाली आहे. त्यात दहिफळ, कोठी, नागझरी, तांबवा, कळंब अंबा, चंदनसावरगाव, कुंबेफळ, साबला, लव्हुरी, शिरुरघाट, नाव्होली, जोला, टाकळी, हनुमंत पिंपरी या ग्रामपंचायती आहेत.

Gram Panchayat Election Results 2022 : दुसऱ्या फेरीत देवगाव, जिवाचीवाडी/तुकुचीवाडी, कासारी, लाडेवडगाव, केकत सारणी, ढाकेफळ, पिसेगाव, कोरेगाव, मस्सा जोग, एकुरका, सारणी (सांगवी), राजेगाव, वरपगाव, कापरेवाडी आणि बोरगाव येथील मतमोजणी होणार आहे.

Gram Panchayat Election Results 2022 : मतमोजणी दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त असून निकाल ऐकण्यासाठी लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणी केंद्राच्या बाहेर अनेक नागरिक निकाल ऐकण्यासाठी इमारतीवर चढून बसले आहेत. सध्या, पोस्टल मतमोजणी सुरू आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news