sukh mhanje nakki kay ast : jaydeep gauri
sukh mhanje nakki kay ast : jaydeep gauri

सुख म्हणजे नक्की काय असतं : जयदीप रचणार गौरीच्या हत्येचा कट?

Published on

पुढारी ऑनलाईन

स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. आपण आई-बाबा होऊ शकणार नाही ही गोष्ट लक्षात येताच जयदीप गौरीने सरोगसीद्वारे मुलाला जन्म देण्याचं ठरवलं. यासाठी मानसीने पुढाकारही दाखवला.

मात्र मानसीचा खरा डाव आता गौरीला कळला आहे. गौरी आई होऊ शकत नाही असे खोटे रिपोर्ट्स मानसीने शालिनीच्या मदतीने तयार केले. गौरीसमोर हे सारं सत्य उघड झालं आहे. शालिनी आणि मानसीचं षडयंत्र गौरी जयदीपला सांगण्याचा प्रयत्न करत असताना त्याने मात्र तिचं म्हणणं ऐकून न घेता तिला उंच कड्यावरून ढकलून दिलं आहे.

गौरीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या जयदीपने असा टोकाचा निर्णय का घेतला? गौरी या जीवघेण्या हल्ल्यातून बचावेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडणार आहेत. त्यासाठी पाहायला विसरू नका सुख म्हणजे नक्की काय असतं सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहावर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news