kriti sanon : घायाळ करणारी अदाकारा कृती सेननचा नवा व्हिडिओ

kriti sanon
kriti sanon
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलीवुड अभिनेत्री कृती सेनन मोठ्या पडद्यावर जितकी सुंदर दिसते, तितकीच ती वैयक्तिक आयुष्यातही स्‍टाइलिश आणि सुंदर आहे. आपले आगळे व्यक्तिमत्व आणि परफेक्ट फिटनेसमुळे फॅशन इंडस्ट्रीतही तिला खास डिमांड आहे. कृती सोशल माध्यमांवरही अतिशय सक्रीय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या लक्षवेधी पोस्ट्समधून चाहत्यांना आकर्षित करण्यात ती कसलीच कसर सोडत नाही.

वीकेंडनंतरचा सोमवार बहुतेकांसाठी अगदीच कंटाळवाणा असतो. मात्र कृतीचे याच्या उलट आहे. तिने आपला आनंदी मंडे मूड चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हे करताना तिने चाहत्यांना एकदम अनोख्या जगात नेले आहे. या अभिनेत्री आज स्वदेशी मायक्रो-ब्लॉगिंग मंच 'कू'वर एक वीडियो शेयर करताना लिहिले, "शायद मेरा #MondayMood ऐसा है।" या व्हीडियोमध्ये ती डोंगरांमध्ये तयार केलेल्या एका टूरिस्ट पुलवर उभी आहे. इथे क्लिक करून बघा व्हीडिओ –

कृतीने मागच्या काही काळात इंडस्ट्रीत आपली ८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फिटनेसच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. तिने फिटनेस कम्यूनिटीत गुंतवणूक करत 'द ट्राइब' नावाचा ब्रॅंड लॉन्च केला आहे. याबाबत कृतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. आपले सौंदर्य आणि निरागस हास्याच्या माध्यमातून लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या कृतीला तिचे चाहते केवळ बॉक्‍स ऑफिसच नाही, तर सोशल मीडियावरही भरभरून फॉलो करतात. 31 वर्षीय ग्लॅमरस कृतीला हरेक प्रकारचे आउटफिट्स खूप शोभून दिसतात.

हेदेखील वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news