अटकेची प्रतीक्षा करतेय म्हणत कंगना रनौतने शेअर केला बोल्ड फोटो

अटकेची प्रतीक्षा करतेय म्हणत कंगना रनौतने शेअर केला बोल्ड फोटो
Published on
Updated on

मोदी सरकारचे कृषी कायदे परत घेतल्याचे जाहीर केल्यानंतर कंगनाने शेतकरी आंदोलनाची तुलना खालिस्तानी आंदोलनाशी केली होती. या विधानानंतर देशातील वेगवेगळ्या ठिकाणी कंगना विरोधात अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. शीख समुदाय (Sikh Community) विरोधात आक्षेपार्ह विधान केल्य़ाप्रकरणी कंगनाविऱोधात महाराष्ट्र पोलिसांनी FIR दाखल केलीय. आता बुधवारी, कंगनाने आपल्या इन्स्टा स्टोरीवर ही माहिती दिलीय की, तिच्याविरोधात आजदेखील एक एफआयआर दाखल झाले आहे. पण, कंगनाला या प्रकाराचा काही फरक पडत नाही.

कंगनाने आपल्या इन्स्टा स्टोरीवर आपला एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये ती वाईनचा ग्ला, हातात घेऊन उभी असलेली दिसतेय. कंगनाने लिहिलंय-एक आणखी दिवस, आणखी एक एफआयआर…जर ते मला अटक करण्यासाठी येताहेत…माझा मूड सध्या घरी असा आहे. फोटोमध्ये कंगना चिल करताना दिसतेय.

काय म्हटलं होतं कंगनाने?

कंगनाने शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आपल्या फेसबुक अकाउंटवर वादग्रस्त पोस्ट लिहिली होती. 'खालिस्तानी दहशतवादी आज भलेही सरकारचे हात मुरडत आहे, पण त्या महिलेला (इंदिरा गांधी) विसरलं नाही पाहिजे, ज्यांनी आपल्या बुटाखाली त्यांना चिरडले होते. परंतु, जीवाची बाजी लावून त्यांना डासासारखे चिरडले, पण देशाचे तुकडे होऊ दिले नाही, त्यांच्या मृत्यूला अनेक दशके उलटली तरी त्यांच्या नावाने थरथर कापतात.

एक दिवस आधी कंगनाविरोधात भोईवाडा पोलिस ठाणे दादरमध्ये एक तक्रार दाखल करण्यात आली होती. शीख बंधुंविरोधात स्टेटमेंट दिल्यांनतर दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटी (DSGMC) ने कंगनाविरोधात देशद्रोह आणि अपमानास्पद विधान केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली होती.

दरम्यान, याप्रकरणी आप नेते राघव चड्ढा यांनी अभिनेत्री कंगना रनौतला समन्स पाठवलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news