विमानतळाची सुरक्षा वाढवणार | पुढारी

विमानतळाची सुरक्षा वाढवणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतला आहे. केंद्रीय सुरक्षा बलाचे 500 अतिरिक्त जवान आता लवकरच पुणे विमानतळावर तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या ठिकाणी सुरक्षेचीसर्व ती काळजीघेण्यात येणार आहे.

सीएसकेची रिटेन पॉलिसी आली समोर; तीन भारतीय खेळाडू रिटेन करण्याची शक्यता

हे विमानतळ भारतीय हवाईदलाच्या अखत्यारीत आहे. येथून भारतीय हवाईदलाच्या विमानांची ये-जा होत असते. इतर देशांकडून हल्ल्यास सुरुवात झाल्यास पुणे विमानतळावरून काही मिनिटांतच जोरदार प्रत्युत्तर देण्याची भारतीय हवाईदलाची क्षमता आहे. मागील महिन्यात पुणे विमानतळावर बाँब असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे दिवसभर विमानतळावर गोंधळ उडाला होता. त्यामुळे विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला आहे.

Shakti Mills Gang Rape : शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण : सात वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

आगामी काळात जवानांची संख्या 858

पुणे विमानतळावरून रोज 60 ते 62 विमानांची उड्डाणे होतात. त्याद्वारे 17 ते 18 हजार प्रवाशांची रोज ये-जा होत असते. त्या प्रत्येकाची तपासणी करण्यासाठी विमानतळावर 5 सुरक्षा यंत्रे आणि 358 केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान आहेत. ही संख्या अपुरी असल्यामुळे विमानतळ प्रशासनाने आणखी 500 जवान तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात येथील सीआयएसएफच्या जवानांची संख्या 858 इतकी होणार आहे.

पुणे विमानतळ लवकरच 24 तास

जवानांच्या राहण्याच्या व्यवस्थेचा प्रश्न कायम

विमानतळ प्रशासनाच्या ताफ्यात आता एकूण 858 केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान असणार आहेत. त्यामुळे येथे बाहेरून आलेल्या जवानांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्यातच विमानतळ परिसरात जागेच्या दरांनी आसमान गाठले आहे. त्यामुळे या जवानांना विमानतळ परिसरात राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देताना विमानतळ प्रशासनाच्या नाकीनऊ येणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.

हवाई मालवाहतुक होणार सुसाट

‘‘पुणे विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाला 17 ते 18 हजार प्रवासी येथून ये-जा करतात. त्यांची तपासणी करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. एखाद्या वेळी एखादी चुकीची घटना येथे घडू नये, याकरिता आम्ही लवकरच सीआयएसएफचे अतिरिक्त 500 जवान तैनात करणार आहे.’’
                                                                                                                           – संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

Back to top button