bbM : जयचं उत्कर्षला सडेतोड उत्तर; टाळी एका हाताने वाजत नाही

bigg boss marathi 3
bigg boss marathi 3

पुढारी ऑनलाईन

बिग बॉस मराठीच्या (bbM) घरामध्ये काल दोन सदस्यांमध्ये जोरदार राडा बघायला मिळाला, ते सदस्य म्हणजे विकास आणि मीनल. विकास त्याचा मुद्दा सोडायला तयार नव्हता आणि मीनल त्यावर स्पष्टीकरण देऊन थकत नव्हती. आराडाओरडा, आरोप सुरू होतं. (bbM) संपूर्ण सिझनमध्ये जे काही एकेमकांसाठी केले ते सगळं बोलून दाखवलं जातं होतं. आज घरामध्ये रंगणार आहे अनोखा टास्क ज्यामध्ये सदस्य एकमेकांना सल्ले देताना दिसणार आहेत. ज्यात उत्कर्षने जयला दाखवला आरसा. त्याच्या या मताने जय जरा दुखावला जाणार हे नक्की!

उत्कर्षचा जयला सल्ला असा आहे की, मित्रा प्लीझ मोठा हो ! मी पणा सोडून दे, मोठं घरं पोकळ वासा पण असं होऊ नये. राग आणि भीक माग ही म्हण लक्षात ठेवा मित्रा! आपल्याकडे शक्ति आहे याचा अर्थ नाहीये की, आपण समोरच्याची लायकीच काढली पाहिजे. जयने त्यावर उत्कर्षला सडेतोड उत्तर दिले, टाळी कधीचं एका हातानी वाजत नाही.

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी पाहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news