Nap Reason : दुपारी ‘डुलकी’ का लागते? संशाेधकांचा माेठा खुलासा

Nap Reason : दुपारी ‘डुलकी’ का लागते? संशाेधकांचा माेठा खुलासा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :

दुपारी नकळत डुलकी लागणं, हे तसं काॅमनच. बसलेल्या जागेवर आपण डुलकी घेतो. आजच्‍या धावपळीच्‍या जगण्‍यात  हा लोकांच्या जगण्‍याचा एक भाग झाला आहे. दरम्यान, यावर आता सखाेल संशोधन झालं आहे. बसलेल्या जागेवर आपल्यापैकी कित्येक जण डुलकी घेतात, याला शास्त्रीय कारण असल्याचे संशाेधनात स्‍पष्‍ट झालं आहे. आपल्‍याला दुपारी डुलकी का लागते? यामागील कारण जाणून घेवूया. (Nap Reason )

अनेकांना दुपारी डुलकी का लागते? यावर मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल (MGH) मधील शास्त्रज्ञांनी संशाेधन केले. त्‍यांनी यामध्‍ये असा निष्‍कर्ष काढला की,  तुमची डुलकी घेण्याची सवय ही आनुवंशिक असू शकते. नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये या संशाेधनासंदर्भात एक लेख प्रकाशित झाला आहे.

Nap Reason : ४५ हजार लोकांचा सर्वे

या संशाेधनासंदर्भात डॉक्टर हसन दश्ती म्हणाले की, झोप घेणे काहीसे ( controversial ) आहे. आपण दुपारची डुलकी का घेतो, याला कारणीभूत असलेल्या जैविक मार्गांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.

संशोधकांनी ४५२,६३३ लोकांच्या जेनेटीक माहिती गोळा केली. ते दिवसभरात किती वेळा झोपले हे देखील या वेळी विचारण्यात आले. या लोकांकडून तीन पर्यायांमध्ये उत्तर देण्यात आले. काम करत असताना दुपारी काही लोकांना अल्‍पकाळ झोप लागली. काहींना नकळत केव्‍हा तरी डुलकी लागायची. याचे निरीक्षण करण्यासाठी 'अ‍ॅक्टिव्हिटी मॉनिटर' ने तपासणी केली गेली.

१२३ कारणे झोपेशी निगडीत

या संशोधनानंतर आमचा आत्मविश्वास वाढला, संशोधनाअंती काढलेले निष्‍कर्ष हे वास्तव आहेत. डुलकी घेतलेले प्रत्‍यक्षात झाेपीच गेले हाेते. संशोधकांनी डुलकी घेण्याच्या संबंधित अनुवांशिक भिन्नता ठरवण्यासाठी  आनुवंशिकतेचा अभ्यास केला. यामध्‍ये दिवसा
झाेपेसाठी १२३ कारणे निगडीत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. ही कारणे डुलकी घेण्याशी संबंधित आहेत, असेही ते म्‍हणाले.

अध्‍यनात असे आढळून आले की, काही लोक सकाळी लवकर उठले होते किंवा त्यांची रात्रीची झोप व्यवस्थित झाली नाही म्हणून डुलकी घेतात. तर काही लोकांना जास्त झोपेची गरज असल्याचेदेखील आढळून आले आहे .डॉ. दष्टी यांच्या माहितीनुसार, दिवसा झोपणे ही केवळ पर्यावरणीय किंवा वर्तणुकीशी संबंधित निवड नसून ती एक आनुवंशिक बाब असू शकते.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news