ViKat Wed : रणबीर कपूरने कॅटला दिलं २.७ कोटींचं गिफ्ट! सलमानने काय दिलं? | पुढारी

ViKat Wed : रणबीर कपूरने कॅटला दिलं २.७ कोटींचं गिफ्ट! सलमानने काय दिलं?

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल (ViKat Wed) यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सलमान खान आणि रणबीर कपूरचा उल्लेख देखील होत आहे. आता असे वृत्तदेखील समोर येत आहे की, कॅटरीनाला सलमान खान आणि रणबीर कपूरकडून वेडिंग गिफ्ट मिळाले आहेत. (ViKat Wed)

मीडिया वृत्तानुसार, सलमान खानने कॅटरीनाला एक लक्झरी कार गिफ्टमध्ये दिली. रणबीर कपूरनेदेखील कॅटरीनासाठी कोटींचं ज्वेलरी सेट पाठवलं आहे. सलमानने कॅटला ३ कोटी रुपयांची चमचमती रेंज रोव्हर (Range Rover) गिफ्ट म्हणून दिली आहे. कॅटरीना कैफ – सलमान आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यामध्ये मैंने प्यार क्यों किया? पार्टनर, युवराज, एक था टायगर, भारत आणि टायगर जिंदा है यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

कॅटरीनाला कथित एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरनेदेखील डायमंडचा नेकलेस सेट गिफ्टमध्ये दिलं आहे. त्याची किंमत २.७ कोटी रुपये सांगितली जात आहे.

कॅटरीना-रणबीरने पहिल्यांदा ‘अजब प्रेम की गजब कहानी’मध्ये एकत्र काम केलं होतं. या दोघे ‘राजनीती’मध्ये एकत्र दिसले होते. यावेळी रणबीर-कॅटच्या लव्ह अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

रणबीर-कॅटने एकत्र ‘जग्गा जासूस’मध्ये काम केलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, रणबीर कपूरची गर्लफ्रेंड आलिया भट्टनेदेखील आपल्या बेस्ट फ्रेंडने लग्नाचं खास गिफ्ट दिलं आहे. आलियाने कॅटला लाखोंचे परफ्यूमने भरलेले बास्केट गिफ्टमध्ये पाठवले आहे. तर शाहरुख खाननेदेखील कॅटरीनाला एक्सपेंसिव पेंटिंग खरेदी करून गिफ्ट दिले आहे. याची किंमत १.५ लाख रुपये आहे. ऋतिक रोशननेदेखील विक्की कौशलला ३ लाख रुपयांची BMW G310R बाईक प्रेझेंटमध्ये दिली आहे. तर विक्की कौशलची मैत्रीण तापसी पन्नूनेदेखील प्लॅटिनमचं एक ब्रेसलेट गिफ्टमध्ये दिलं आहे. त्याची किंमत १.४ लाख रुपये आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

Back to top button